Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी...!
जळगाव शहर आम आदमी पार्टीकडून समाजसुधारक,लोक शाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी...!
जळगाव प्रतिनिधी:-संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे शिलेदार कष्टकरी मजुरांची लढाई लढणारे,रशिया सारख्या देशात जाऊन भारताचे नाव लौकिक वाढवणारे समग्र क्रांतीचे स्वप्न घेऊन चळवळ चालवणारे दीड दिवस शाळा शिकून 35 कादंबऱ्या तीन प्रवास वर्णन साथहून अधिक नाटके एवढा मोठा लिखाण प्रपंच मराठी साहित्य क्षेत्रातील साहित्य सम्राट महाराष्ट्रासाठी भूमिगत होऊन डफ हाती घेऊन आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन करणारे आपल्या लिखाणातून वंचित घटकात राहणाऱ्या नायक व नायिका व्यवस्थेची कशा प्रकारे लढतात त्या लढण्यातून अनेक सत्य घटना मांडणारे प्रबोधनकार लेखक कवी अशा एक ना अनेक भूमिका साकारणारे कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आज जळगाव शहर आम आदमी पार्टी कडून साजरी करण्यात आली आहे.
ह्या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी,
महानगराध्यक्ष योगेश हिवरकर,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अमृता नेतकर,मिलिंद दादा चौधरी,मीडिया प्रमुख योगेश भोई,सल्लागार डॉ सुनिल गाजरे सर,डॉ नारायण आटकोरे,अनिल वाघ सर, रईस कुरेशी,adv विजय दाणेज,सोनल तिवारी,सरिता तायडे, माधवराव जाधव,ओम प्रकाश अग्रवाल,पवन खबायत,ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपर्क मीडिया प्रमुख
योगेश भोई
मो.न.7823829239
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा