Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १ ऑगस्ट, २०२३

राष्ट्रीय कार्यास हाती घेऊन महापुरुषांना अभिवादन....!



ज्ञानोपासक शिक्षण मंडळी दोंडाईचा संचलित श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय रंजाणे ता. शिंदखेडा जि.धुळे येथे राष्ट्रीय कार्यास हाती घेऊन भारतीय स्वातंत्र्याचे जनक लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

याप्रसंगी विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री एस सी पाटील अध्यक्षस्थानी होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक आण्णासाहेब विठ्ठलसिंग गिरासे, उपमुख्याध्यापक श्री के एम पाटील, राज्य आदर्श शिक्षक एन पी भिलाणे,श्री व्ही बी बोरसे,श्री अनिल चौधरी,श्री आर बी शिरसाठ,श्री अभिजीत बेहेरे,श्रीम.एच.पी.पवार, श्री उमेश पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री एस सी पाटील यांनी राष्ट्रपुरुषांच्या विचारांची आपल्याला गरज आहे असे मत आपल्या   अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.

एन.पी.भिलाणे यांनी महापुरुषांच्या विचारांसोबतच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती अभियान, बालविवाह, बालमजुरी, राष्ट्रीय एकात्मता व देशाच्या मजबूत लोकशाहीसाठी 18 वर्ष वय पूर्ण झालेल्या युवक- युवतींना मतदार यादी मध्ये  नोंदणीसाठी प्रोत्साहित करणे, शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रयत्न करणे. या संदर्भात जनजागृती करण्यात आली व विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना राष्ट्रीय कार्यास सहकार्य करण्याची प्रतिज्ञा राज्य आदर्श शिक्षक श्री एन. पी. भिलाणे यांनी दिली.

इंग्रजी विषयाचे उपक्रमशील शिक्षक श्री व्ही व्ही बोरसे यांनी महापुरुषांचे विचार आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना देऊन प्रोत्साहन दिले.
विद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एन.पी भिलाणे यांनी केले.आभार श्री के एम पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महेंद्रसिगं गिरासे ,संजयभाऊ गुरव, विजय ढोले यांनी विशेष परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध