Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
प्रथम अपिलाची सुनावणी न घेणा-या शिंदखेडा तहसिलदार यांच्यावर शिस्तभंगाची टांगती तलवार…!
प्रथम अपिलाची सुनावणी न घेणा-या शिंदखेडा तहसिलदार यांच्यावर शिस्तभंगाची टांगती तलवार…!
प्राप्त माहितीनुसार नंदुरबार येथिल श्रीमती एस.के.पाटील यांनी 23/11/2022 रोजी माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती मागणी अर्ज जन माहिती अधिकारी, पुरवठा विभाग, तहसिल कार्यालय, शिंदखेडा यांच्याकडे केलेला होता.मात्र या जन माहिती अधिका-यांने कोणतीही माहिती मुदतीत पुरविली नाही अथवा त्याबाबत कोणताही आदेश केलेला नसल्याने श्रीमती पाटील यांनी दि. 9/1/2023 रोजी प्रथम अपिलाचा अर्ज तहसिलदार शिंदखेडा यांच्याकडे केलेला होता. मात्र प्रथम अपिलिय अधिकारी यांनी मुदतीतच नव्हे तर तब्बल 3-4 महिने उलटल्यानंतर देखील माहिती अधिकारार्गतचे प्रथम अपिलावर सुनावणीच घेतली नाही. त्यामुळे अर्जदार श्रीमती पाटील यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 चे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे कर्तव्य पालनात कसूर करणा-या जन महिती व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणेबाबत प्रथम तक्रार अर्ज 3 एप्रिल रोजी सादर केलेला होता. त्यानंतर 8 मे रोजी द्वितीय तक्रार अर्ज सादर केल्यानंतर देखील अजून पावतो काहीच कार्यवाही होत नाही. असे अर्जदार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तृतीय तक्रार अर्ज दि. 27 जुलै 2023 रोजी दिलेला होता. व त्यावर श्रीमती पाटील हे जिल्हाधिकारी यांच्याच विरुध्द त्यांच्याच लोकशाही दिनात अर्ज सादर करणार होते. मात्र जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने याबाबत दखल घेत, महेश शेलार जिल्हा पुरवठा अधिकारी धुळे यांनी जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडे कर्तव्य पालनात कसूर करणा-या जन महिती व प्रथम अपिलीय अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणेबाबत प्रस्तावाधिन पत्र सादर केलेले आहे.
खरोखरच जिल्ह्यातील ब-याच शासकिय कार्यलयात जन माहिती अधिकारी हे माहिती देत नाही. व प्रथम अपिलावर सुनावणी देखील घेत नाही. दोन दिवसापुर्वीच आम्ही शिंदखेडा तालुक्यातील सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था शिंदखेडा यांनी वर्षभरात प्रथम अपिलावर सुनावणी घेतलेली नसल्याची बातमी प्रकाशित केलेली होती. व त्यानंतर आम्हाला ही बातमी मिळाली. त्यामुळे अश्या अधिका-यावर कठोर कारवाई होणेच जनतेला व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे. व याचमुळे उत्तर महाराष्ट्राचे माहिती अधिकार कार्यकर्ता विभाग प्रमुख संजय नंदुरबारे यांनी उत्तर महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना अव्हाण केले आहे की, जर कोणत्याही माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या बाबतीत असे घडलेले असेल तर त्यांनी संजय नंदुरबारे व संतोष भोई यांच्याशी 7588003956 ,9850486340 मो.नं.वर संपर्क करावा. व आपला मुळ अर्ज व त्यांची पोहच, प्रथम अपिलाचा अर्ज व त्याची पोहच हे मला दिलेल्या संपर्क नंबरवर व्हाटसॲप नंबरवर पाठवावे. जेणे करुन अश्या सर्व अधिका-यांची यादी व पुरावे एकत्र करुन राज्य महिती अयुक्त व म, राज्यपाल यांच्या समोर ही तक्रार सविस्तरपणे मांडता येईल. तरी उत्तर महाराष्ट्रातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने अश्या प्रकरणांबाबत एकत्र येण्याचे अव्हाण करीत आहे.असे संजय नंदुरबारे यांनी सांगितले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा