Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २३ ऑगस्ट, २०२३

शिरपूर तालुक्यात काळे झेंडे दाखवून गावितांचे स्वागत...!




शिरपूर शहरात  आगमन झाल्यानंतर आदिवासी टोकरे कोळी समाजाने आदिवासी विकास मंत्री डॉ.गावितांना शहरातील करवंद नाक्यावर दाखवले काळे झेंडे दाखवून स्वागत केले आहे.

या प्रकरणात काही तरुणांना अटक करण्यात येऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.

आदिवासी बांधवांवरील मणिपूरच्या दुर्दैवी अत्याचार आणि तालुक्यातील आदिवासी क्रांतिकारकांचा फलक फाडल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सदरच्या निषेध नोंदवण्यात आला आहे. शिवाय शिरपूर सांगवी येथील दंगलीमध्ये निर्दोष युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी देखील मागणी आदिवासी युवकांकडून होत आहे.

त्यामुळे स्थानिक आमदार खासदार, मंत्री यांच्यावरील आदिवासी समाजाची नाराजी वारंवार उफाडून येत असून या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी भविष्यात हा विषय राजकीय चिंचेच्या विषय असू शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध