Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
मटनाबरोबर इथेच्छ मार खाणारा बेवड्या, लबाड.भ्रष्ट्राचारी, लाचखोर लेखापरीक्षक अखेर जेरबंद...! सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक वर्ग-दोन) यांना पाच लाखाची लाच घेतांना एसीबी अधिक-यांनी रंगेहात पकडले.
मटनाबरोबर इथेच्छ मार खाणारा बेवड्या, लबाड.भ्रष्ट्राचारी, लाचखोर लेखापरीक्षक अखेर जेरबंद...! सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक वर्ग-दोन) यांना पाच लाखाची लाच घेतांना एसीबी अधिक-यांनी रंगेहात पकडले.
प्रतिनिधी:- यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.
यावल,सावदा ता.रावेर जि.जळगाव या संस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच घेतांना दि.१७/ऑगस्ट २०२३रोजी एसीबीच्या अधिका-यांनी थकित कर्जदार व गाळा मालक यांच्या तक्रारीवरुन सापळा रचून रंगेहात अटक करण्यात आल्याने जळगांव जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, सदर गाळा मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती.या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचला.यात सखाराम कडू ठाकरे (वय 56,रा.पाचोरा) यांना धुळे येथे लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे.ताज्या वृत्तानुसार त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो/निरीक्षक हेमंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पो.नि.रूपाली खांडवी,पो.हवालदार राजन कदम, शरद काटके,पो.शि.संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पो.हवालदार सुधीर मोरे यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे.त्यांचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.
सदर कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन.१९८८चे कलम ७ अन्वय काल रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याचे नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेवर सध्या अवसायकाची नियुक्ती करण्यात आलेले सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे अवसायकपदाची सूत्रे आहेत. या पतसंस्थेच्या सावदा येथील शाखेत सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता. यानंतर गाळा मालकाने फेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत गाळा आणि याची अमानत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी अवसायकाकडे मागणी केली असता. अवसायक सखाराम कडू ठाकरे यांनी त्या गाळा मालकाकडे पाच लाख रूपयांची मागणी केली होती.त्यानुसार त्यांनी एसीबीला तक्रार दिल्यानंतर शिताफ़ीने त्यांना रंगेहाथ लाच घेतांना पकडले.
यापुर्वी देखील तॊंदे वि.का. सोसायटीच्या फ़ेर लेखापरीक्षणा कालावधीत एस.बी.नंदुरबारे यांच्याकडे दहा हजार रुपयांची मागणी केल्याची बातमी आम्ही तरुण गर्जना या वृत्तपत्राला प्रकाशित केली होती.तर फ़ेरलेखापरीक्षण कालावधीत तर्रार दारु घस्यात ऒतून बाहेरील गावगुंडाना बरोबर आणुन गावातील लेकांविषयी अपशब्द व शिवीगाळ केल्याने स्थानिक लोकांनी सुजेपर्यत पब्लिक चोप दिल्यानंतर ग्रामस्थांच्या पायशी लोटांगण घालत कसे बसे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करुन तेथून पळ काढला होता.अश्या ह्या बेवड्या, लबाड.भ्रष्ट्राचारी, लाचखोर लेखापरीक्षकास एसबी च्या अधिका-यांनी रंगेहात पकडल्याचे वृत्त शिरपूर तालुक्यातील तोंदे गावात आतिशय जलद गतीने पोहचल्यानंतर गावक-यांनी त्यांचा पापाचा घडा भरलाच होता.मात्र तो दुस-या जिल्ह्यात जाऊन फ़ुटाला असे म्हणत “जशी करणी तशी भरणी” असे एका वाक्यात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा