Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १९ ऑगस्ट, २०२३
जिल्ह्यातील नांमाकित..... शेतकऱ्यांच्या बँकेतील वशिलेबाजी संपता संपेना…!
शिरपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यातील नामांकित शेतकऱ्यांच्या बँकेत आजही तोंड पाहून केले जाते काम.अशी एक परिस्थिती पाहण्यास मिळाली. शिंदखेडा तालुक्यात विभागीय अधिकारी .... चौधरी यांच्या परवानगी शिवाय कोणत्याही शेतकरी संस्थेच्या दैनंदिन खर्च अथवा त्यांच्या संस्थेचे लेखापरीक्षण शुल्क आदा केले जात नाही.खरे पहाता हा त्यांचा अधिकारच नाही.कारण ऑडिटर हा संस्थेने नियुक्त केलेला आहे,बॅकेने नव्हे.तो संस्थेचा ऑडिटर आहे, बॅकेचा नव्हे.तो संस्थेची ऑडिट फ़ी घेतो, बॅकेची नव्हेच.तरी देखील हा चुकीचा प्रकार सुरु आहे.
गतवर्षी एका लेखापरीक्षकाची लेखापरीक्षण शुल्क काही संस्थांकडे घेणे बाकी असल्याने व संस्था करंट खाती पैसा शिल्लक असल्याने संस्था चेअरमन व सचिव यांनी प्रथम ऑडिट फ़ि देण्याचे ठरविले, मात्र सदर संस्थेचे आम्हीच मालक या अविरभावात शेतकरी बॅकेचे विभागीय अधिकारी त्यास मंजूरी देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संबंधित लेखापरीक्षकाने विभागीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वरीवरून संपर्क केला असता, मिळेल कुठे जाते ऑडिट फी, आता मी तुम्हाला देऊ शकत नाही, असेही आम्ही ऑडिट फी चार-चार वर्षे देत नाही, तरी काही होत नाही.अशा प्रकारचे वक्तव्य केले होते. जसे काही ही ऑडिट फ़ी तो त्याच्या खिसातू अथवा पगारातून देतो आहे.
त्यामुळे त्यांच्या ……ठिकाणी ….. लागत होती.अश्या दिमाखात तो बोलत होता. व हेच मोठे दुखणे आहे ह्या शेतकरी बॅकेच्या अधिका-यांचे. जर शेतकरी संस्थेबाबत सर्वच निर्णय बॅकेच्या मंर्जीनुसार घेवयाचे असतील तर,मग संस्थेचे संचालक नेमके कश्यासाठी ? व त्यांची निवड काय ……..म्हणू आहे की काय? हेच कळत नाही.मात्र ज्यावेळेस हे शेतकरी संस्थांच्या संचालकांना एकदा का कळले की,नक्की संस्थेचे मालक कोण ? त्यावेळेस मात्र जे वशिलेबाज अधिकारी व त्यांचा….मोरक्या ...चौधरी यांना पळती भुई थोडी होईल.हे मात्र नक्कीच.चालू वर्षात शिंदखेडा तालुक्यातील……. शाखेतील एका शेतकरी संस्थेचा ऑडिट मेमो अजून त्या संस्थेच्या सहाय्यक निबंधक तथा लेखापरीक्षक विभागाला देखील जमा झालेला नसताना या वशिलेबाज विभागीय अधिकाऱ्यांच्या मर्जीतील लेखापरीक्षकाने ऑडिट मेमो दिलेला नसतांना देखील रु....../- च्या लेखाशुल्कास कशी काय मंजुरी मिळाली ? तेच कळत नाही. शक्यतो ऑडिट फी रकमेतील टक्केवारी मिळाली असावी अशी शंका निर्माण होत आहे. अथवा तो ऑडिटर शेतकरी बॅकेचा विभागीय अधिका-याचा …. होता काय ? याबाबत आमच्या प्रतिनिधीने निबंधक कार्यालय व तालुका लेखापरीक्षक कार्यालय यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याबाबत सत्यता जाणून घेतली असता ही माहिती उघड झाली. अश्या ह्या वशिलेबाज अधिका-यांना बॅक वठणीवर आणनार का ? असा प्रश्न शेतकरी बॅकेच्या इतर दु:खीत आम्तमे व सहकारातील जाणकार व अभ्यासू व्यक्तीनी व्यक्त केला आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा