Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १६ ऑगस्ट, २०२३



माणसाची सेवा हीच खरी ईश्वर सेवा' हे बोलायला, लिहायला लोकांना उपदेश करायला सोपे वाटते.मानव सेवा वगैरे दूरची गोष्ट आहे हो.पण आई,वडील यांची सेवा करणे देखील आजच्या युगात दुरापास्त झालं आहे. कोरोना काळात फोनवरून आपल्या नातेवाईकांची अंत्यविधी देखील केलेली आपण पाहिली आहे.पण सर्व गोष्टीला अपवाद आहे.तो चोपड्यातील बाबा आमटे म्हणजेच नरेंद्र पाटील (एन.आर.पाटील) अमर संस्था संचलित मानव सेवा तिर्थ' हा प्रकल्प गेल्या ५ वर्षापासून तालुक्यातच नव्हे तर देशभरात सेवा देत आहे.

चोपडा येथील मानव सेवा तीर्थमध्ये खऱ्या अर्थाने मानवांची सेवा केली जाते,ती देखील समाजाने नाकारलेल्या, समाजाला नको असलेल्या मनोरुग्णांची समाज कार्याचा वसा घेतलेल्या अमर संस्थेने हा प्रकल्प सुरू केला आणि या रथाचा सारथी झाले ते नरेंद्र पाटील, ज्याच्या नसानसांत, मनामनात सेवा भिनली आहे. सेवा हाच खरा धर्म आणि बेघर मनोरुग्ण हेच आपले खरे कुटुंबज्ञमानणाऱ्या बेवारसाच्या सखा कपडे, पांघरून आणि माणसांना माणसासम वागणूक देण्यासाठी धडपडत करीत असतात.मनोरुग्ण हेच आपले खरे कुटुंब मानणान्या बेवारसाच्या सखा नरेंद्र पाटील साठी खूप अवघड प्रवास होता. नरेंद्र पाटील यांची आर्थिक परिस्थिती फार चांगली नाही, स्वतःच कमावणारे असताना देखील कुटुंबाची चिंता न करता मनोरुणाची काळजी व चिंता करणाऱ्या चोपडातील हा बाबा आमटे आपले घर ते मानव सेवातिर्थ सायकलने जातांना दिसतो.गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी स्वतः कधीच नवे कपडे घेतले नाहीत.अमर संस्थेतील वस्त्र पेढीतील येणारे जुने कपड़े ते आजही वापरतात. सकाळी ७ वाजेपासून ते रात्री प्रभुजी झोपेपर्यंत ते प्रभू सेवेत लीन असतात. प्रभुजी व त्यांच्यात मातृत्वाचा हा लळा प्रभुजी जेव्हा आपल्या परिवारात जातात तेंव्हा अश्रू बनून बाहेर येतो. बहुतेक प्रभुजी नरेंद्र पाटील साठी खूप अवघड जाईल.त्यांना सकस आहार कपड्यातच मलमूत्र विसर्जन
प्रवास होता. मनोरुग्ण हेच आपले खरे कुटुंब मानणाऱ्या बेवारसाच्या सखा नरेंद्र पाटील साठी खूप अवघड प्रवास होता.परंतु अतिशय प्रेमाने स्वतःचे परिवार विसरून आपल्या सहकारी बांधवांच्या मदतीने एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल ८२० बेवारस मनोरुग्रावर या पठ्याने सहकाऱ्यांच्या मदतीने काम केले. मानव सेवा तीर्थमध्ये बेवारस मनोरुग्णांना प्रभुजी म्हणतात. म्हणजे हे मनोरुग्ण नसून परमेश्वराचा अवतार आहे.ह्या भावनेतून पेटून उठत आजतागायत ६९० प्रभुजी आपापल्या परिवारात पाठविण्यात आले. आताही मानव सेवा तिथं परिवारात १३० प्रभुजी महिला व पुरुष सेवा घेत आहेत.नरेंद्र पाटील हे नेहमी रस्त्यावरील जखमांनी व्यापलेल्या केसांच्या जटा, वाढलेली दाढी मिश्यांचे जंजाळ, ऊन वारा पावसाशी हतबलपणे सामना करणाऱ्या माणसांच्या सहवासात दिसतात. ह्या सर्वांना हक्काचे घर तेथे त्यांची काळजी घेतली

कसा मिळेल, वे ळे वर करतात, तरी कोणतीच घृणा औषधोपचार, चांगले स्वच्छ मनात न आणता नरेंद्र पाटील व त्याचे सहकारी हे काम मोठ्या कर्तृत्वाने करतात. नरेंद्र पाटील यांना त्यांच्या सहकान्या विषयी खूप अभिमान आहे. त्या निर्मल सोनवणे, अरुण वडार, विठोबा कोळी, किशोर शिंदे आणि सविताताई कोळी असे हे प्रभु पुजारी आहेत. पाटील स्वतः प्रभुजींना जेवू घालण्याचे काम करतात, दिव्यांग प्रभुजींची सेव रोजचा भाग असतो, त्यांचे काम बघून वाटते सलाम ह्या कर्मयोगीला, रस्त्यावरील बेवारस मनोरुणांना छातीशी धरून त्यांना माया, प्रेम देणाऱ्या व आपल्या परिवाराची आठवण देखील येऊ न देणाऱ्या, प्रभुजी बरे झालेत आणि परिवाराचा पत्ता सांगितला म्हणजे त्यांना अत्यानंद होतो. प्रभूला स्वतःचा परिवार मिळणार म्हणून माणसातील माणूसपण कस जपावं आणि मोडलेली माणसं पुन्हा कशी उभी करावी हा एकच छंद आहे या माणसातील देवाचा असून त्याला नरेंद्र पाटील म्हणतात.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध