Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १५ ऑगस्ट, २०२३

धाडणे गावात भारताचा 77 व स्वतंत्र दिवस उत्साहात साजरा धान्याचे भूमिपुत्र व तालुक्याचे ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ बाबासो जयवंत आहेरराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले



आज धाडणे गावात माध्यमिक विद्यालय कर्मवीर शंकरराव चिंधुजी बेडसे विद्यालय प्रांगणात 77 वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला .शाळेचे ध्वजारोहण धाडणे गावाचे सुपुत्र व सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.बाबासाहेब जयंवतराव बळीराम अहिरराव यांच्या शुभहस्ते पार पडले.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साक्री तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त भाऊसाहेब दिपकजी अहिरराव,धाडणे गावाचे सरपंच माईसाहेब उषाबाई सोनवणे,उपसरपंच अनिता बाई संजय अहिरराव ,पोलीस पाटील दादासो. चेतनानंद अहिरराव ,माजी पोलीस पाटील आबासाहेब भीमराव लाडे ,सर्व ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका,विविध कार्यकारी सोसा.अध्यक्ष पालक ,ग्रामस्थ, उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते ध्वज पुजा करण्यात आली व डॉ बाबासाहेब जयवंतराव अहिरराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर शाळेच्या स्काऊट,गाईड,व आरएसपी ,एमसीसी या पथकांनी ध्वजाला मानवंदना दिली व प्रमुख अतिथी यांनी सर्व पथकांचे निरीक्षण केले. त्यानंतर इ 8 वी विद्यार्थ्यांनिनी "ओ राजे" या गीतावर देशभक्तीपर नृत्य सादर केले.त्यानंतर विद्यालायच्या वतीने प्रमुख अतिथी यांचा व इ.10 मध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा व इ 5 वी ते 10 वी या वर्गात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी दिनविशेष सांगून सर्व उपस्थित मान्यवरांची मने जिंकून घेतली.त्यानंतर प्रमुख अतिथी डॉ. बाबासाहेब जयवंतराव अहिरराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मी गावाच्या सेवेसाठी, विकासासाठी मी सदैव तत्पर असून गावाचा व शाळेचा मी नेहमी ऋणी राहील असे सांगितले.शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश पाटील व श्री राहुल पवार यांनी केले.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासो राजकुमार खामकर यांचे मार्गदर्शन लाभले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध