Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३

साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला. बारीपाडा येथील वृक्षमित्र व राष्ट्पती पुरस्कार प्राप्त श्री चैत्राम पवार यांचा हस्ते उद्घाटन करण्यात आले



आज दिनांक 11ऑगस्ट 2023 रोजी तालुका स्तरीय रानभाजी महोत्सव विद्यानंद हायस्कूल पिंपळनेर तालुका साक्री येथे साजरा करण्यात आला होता.कार्यक्रम प्रसंगी रानभाज्याचे प्रदर्शन व विक्री, रानभाजी पक्वान्न स्पर्धा, रानभाज्यांचे आहारातील महत्त्व या विषयावर निबंध स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुभाष जगताप हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून रानभाजी महोत्सवाचे प्रणेते बारीपाडाचे श्री चैत्राम भाऊ पवार हे होते.महोत्सवानिमित्त ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनीमध्ये तालुक्याच्या विविध भागातून शेतकरी विद्यार्थी व कृषी विभागाचे कर्मचारी यांनी आणलेल्या रानभाज्यांची मांडणी करण्यात आली होती. रानभाजीचे आहारातील महत्त्व या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थिनी अश्विनी चौरे प्रथम क्रमांक, मयुरी अहिरे द्वितीय क्रमांक तर अश्विनी वळवी या विद्यार्थिनीचा तृतीय क्रमांक आला.रानभाजी पक्वान्न स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या 27शालेय विद्यार्थिनींनी चविष्ट अशा विविध प्रकारच्या रानभाज्यांच्या डिशेस सजवून आणल्या होत्या. या स्पर्धेत दिपाली चौरे प्रथम क्रमांक, मयुरी अहिरे द्वितीय क्रमांक व अर्थ खैरनार आणि संस्कृती महाले या विद्यार्थिनींना विभागून तृतीय क्रमांक देण्यात आला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.सभोवताली परिसर व जंगलामध्ये मिळणाऱ्या वनस्पती हे मानवासाठी निसर्गाची अनमोल देन आहे. या वनस्पतींचे जतन व संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे असे यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री चैत्राम भाऊ पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.श्री योगेश सोनवणे तालुका कृषी अधिकारी साक्री यांनी मनोगत व्यक्त करताना रानभाजी पक्वान्न स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना रानभाजी व पौष्टिक तृणधान्य यांचे आहारातील व मानवी आरोग्यातील महत्व याविषयी तानाजी सदगीर मंडळ कृषी अधिकारी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी,पंचायत समिती सदस्य देवेंद्र गांगुर्डे, शामाकांत पगारे, संस्थेचे सहसचिव शामाकांत शिरसाठ,शैलेंद्र पाटील, विद्यानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक सागर शहा यांची उपस्थिती लाभली.आभार प्रदर्शन सुरेंद्रनाथ शिंदे मंडळ कृषी अधिकारी साक्री यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कृषी पर्यवेक्षक शिवाजी राऊत,पुंडलिक महाले, कृषी सहाय्यक अभय महाले,सर्जेराव अकलाडे ,बीटी गायकवाड चंदू सूर्यवंशी अर्चना मेधने,छाया वेंडाईत शाळेतील शिक्षक विशाल गांगुर्डे,उदय एखंडे,अरुण गांगुर्डे,पंडित गोयकर यांच्यासह साक्री तालुक्यातील कृषी विभागातील कृषी सहाय्यक,अधिकारी,कर्मचारी व विद्यानंद शाळेचे शिक्षक व कर्मचारी रुंद यांनी विशेष मेहनत घेतली.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध