Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०२३

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ शेगांव तालुका व शहर यांच्यावतींना तहसीलदारामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन...!



शेगाव प्रतिनिधी (उमेश राजगुरे)
शेगाव -पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजातील घटकातील लोकांनी पत्रकाराकडे आरसा असततो.परंतु हा समाजाचा असाच न्याय देण्याचे समाजासाठी वाचा फोडण्याचे काम करत असेल तर निश्चितच ही आनंदाची बाब आहे.परंतू याला अपवाद मनून पत्रकारांवर हल्ला होण्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 


असाच निंदनीय प्रकार जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार सोबात घडला घडलेला प्रकार असा की संदीप महाजन यांना बुधवारी दिनांक 9/8/ 2023 दुपारी नगर पालिके समजून आपल्या टू व्हीलर गाडीने जात असताना ,तोंडावर रुमाल बांधून काही अज्ञात व्यक्तींनी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केली.हा प्रकार अतिशय निंदनीय असुन मारहाण करणाऱ्यांवर पत्रकार संरक्षण कायदया अंतर्गत कठोर कारवाई करण्याबाबत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदन शेगाव तहसिलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आले. 

सदर सहिनिशी निवेदन देताना अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष देवचंद समदूर,तालुका कोषाध्यक्ष सागर सिरसाट,शेगांव शहर अध्यक्ष उमेश राजगुरे.,गौतम इंगळे ऋषिकेश देठे,कमलेश शर्मा,अजून कराळे,श्रीकांत कलोरे,दिनेश घाटोळ,इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध