Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०२३

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने अवघ्या काही तासात लावला चोरीचा छडा...! मार्केट मधून बैलजोडी चोरी गेली तरी कशी ? मार्केटचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते काय ?



शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने अवघ्या काही तासात बैलजोडी चोरीचा छडा लावून बैल जोडी हस्तगत करत चार आरोपींवर गुन्हा दाखल करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शिरपूर शहर पो.स्टे. गु.र.नं. ४३३/२०२३ भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी मुनीराम खुमसिंग पावरा वय ४६ व्यवसाय बैल खरेदी विक्री व्यवसाय रा.धावापाडा ता. शिरपूर जि.धुळे यांनी फिर्याद दिली की, दि.०९/०९/२०२३ रोजी दुपारी ४.०० वाजता ते दि.१०/०९/२०२३ रोजीचे सकाळी ७.०० वाजेचे सुमारास त्यांच्या मालकीची ६०,०००/- रूपये किमतीची पांढऱ्या रंगाची बैल जोडी शिरपूर जि.धुळे येथील गुरांचे मार्केटमध्ये बांधलेली असतांना ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत दिलेल्या फिर्यादवरून गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री.ए.एस. आगरकर, शिरपूर शहर पो.स्टे.यांनी डी.बी.पथकाचे पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने तपासचक्रे फिरवून गुप्त बातमी काढुन संशयीत इसमाचा शोध घेत असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपूर जि. धुळे येथील गुरांचे मार्केट मधुन पांढऱ्या रंगाची बैल जोडी इसम नामे आरीफ मजीद तेली व त्याचा साथीदार रितीक रतन शिरसाठ दोन्ही रा.शिरपूर जि.धुळे यांनी चोरून नेले असल्बायाची बातमी मिळाल्याने सदर इसमांचा शोध घेत असतांना इसम नामे आरीफ मजीद तेली हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून सखोल विचारपूस करता त्याने त्याचे साथीदार रितीक रतन शिरसाठ तसेच सनी धुडकु सोनवणे व किरण गोपाल सोनवणे (शिंपी) रा. शिरपूर जि. धुळे यांचे मदतीने गुरांचे मार्केट मधील पांढऱ्या रंगाची बैलजोडी चोरून नेल्याचे कबुल करून सदरची बैल जोडी रामसिंग नगर जवळील बर्फ कारखान्या जवळ मोकळया जागेत झाडांजवळ बांधलेली असल्याचे सांगुन बेल जोडी दाखविल्याने जप्त केली. त्यावरून सदर गुन्ह्यात आरोपी नामे १) आरीफ मजीद तेली वय २९ रा. आदर्श नगर, शिरपूर जि. धुळे. २) सनी धडकु सोनवणे वय २६ व ३) किरण गोपाल सोनवणे (शिपी) वय २८ दोन्ही रा. क्रांती नगर, शिरपूर जि. धुळे व ४) रितीक रतन शिरसाट वय १९ रा.पंड्या मांगवाडा, शिरपूर जि. धुळे असे गुन्ह्यात निष्पन्न झाले असुन त्यांनी सदरचा गुन्हा संगणमताने केलेला आहे..

वरनमुद आरोपीतांकडुन गुन्ह्यातील चोरीस गेला माल ६०,०००/- रूपये किंमतीची पांढ-या रंगाची बैल जोडी हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सदर गुन्ह्यात वरील आरोपीतांना दि.११/०९/२०२३ रोजी अटक केली असुन त्यांची १ दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळाली असुन सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ/ललीत पाटील करीत आहेत.सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.संजय वारकुंड, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे यांचे मार्गदर्शना खाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे, श्री.ए.एस.आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पो.स्टे.तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ/ललीत पाटील, पोना/ रविंद्र आखडमल, पोका/विनोद आखडमल, गोविंद कोळी, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, सचिन वाघ, आरीफ तडवी, मनोज महाजन अशांनी मिळून केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध