Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १४ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
कुरुकवाडे वि.का.सहकारी सोसायटीचा सन २०२२-२३ चा लेखापरीक्षण अहवाल केला नामंजूर... सोसायटीच्या संचालक मंडळ सभेत घेतला हा मोठा निर्णय....!
कुरुकवाडे वि.का.सहकारी सोसायटीचा सन २०२२-२३ चा लेखापरीक्षण अहवाल केला नामंजूर... सोसायटीच्या संचालक मंडळ सभेत घेतला हा मोठा निर्णय....!
शिरपूर प्रतिनिधी:- सध्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बाबतीत केंद्र शासन व राज्य शासन अत्यंत प्रखरपणे डोळ्यात तेल टाकून कामकाज करीत आहे केंद्र शासनाने या कृषी पतसंस्थांना ग्रामीण भागातील एक मिनी बँक बनवण्याच्या मार्गावर कामकाज सुरू केले आहे. त्या अंतर्गत विविध व्यवसाय देऊन तिला बहुउद्देशीय स्वरूप देण्याचा देखील प्रयत्न केला गेला आहे. भविष्यात ह्या कृषी पतसंस्था जिल्हा बँकेच्या तोडीस तोड काम करताना दिसून येतील. शासनाने विविध असे १५१ व्यवसाय या कृषी संस्थांना देत त्यांचे विकासासाठी घेतलेल्या अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. या कृषी पतसंस्थांचे संगणकीकरण हा देखील त्यांनी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय आहे. आणि म्हणून अशा संस्थांचे लेखापरीक्षण देखील योग्य पद्धतीने होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील सध्या सर्वात जास्त वादग्रस्त असलेली कुरुकवाडे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेच्या संचालक मंडळ सभा दिनांक २९ ऑगस्ट रोजी संचालक मंडळासमोर सन २०२२-२३ चा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या संस्थेची सन २०२२-२३ चे लेखापरीक्षण बी.बी. जोगी, सहकारी संस्था नंदुरबार यांनी केलेले आहे. या लेखापरीक्षण अहवालावर सभेत सविस्तर चर्चा होऊन सदर लेखापरीक्षण अहवाल विविध अशा कारणांमुळे संचालक मंडळ सभेने सन २०२२-२०२३ चा बी.बी. जोगी यांचा वैधानिक लेखापरीक्षण अहवाल नामंजूर केला आहे. त्यामुळे संस्थेच्या सचिवांनी याबाबत काय पत्रव्यवहार केला व त्यावर सहकार विभागाने अशा लेखापरीक्षकावर काय कारवाई करेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यातच याच महिना अखेर पर्यंत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा देखील होणे गरजेचे आहे तत्पूर्वी संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी सहाय्यक निबंधक काय उचित कार्यवाही करतात हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नंदुरबार प्रतिनिधी :- आज सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी संत श्री भीमा भोई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमापूजनाचा कार्यक्रम शहरातील नव...
-
मुकेश लोढा :- वणी नगरीत सध्या भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्र गौरव, खान्देश केसरी तथा “वणी के जादूगार” म्...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा