Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १७ सप्टेंबर, २०२३

अनेर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत डेंगू संरक्षणाला सुरुवात...!



गलंगी तालुका चोपडा मच्छिंद्र रायसिंग
अनेर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत डेंगू संरक्षणाला सुरुवात
गलंगी तालुका चोपडा जिल्ह्यात डेंगू सारख्या आजाराने चांगलेच डोके वर काढले असून भीतीचे वातावरण तयार झाले असून त्या अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र हातेड यांनी वैद्यकीय अधिकारी विवेक जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अनेर परिसरात डेंगू आजाराविषयी मार्गदर्शन व पाण्याने भरलेले ड्रम गटारी विषयी डेंगू चा डास पासून सावधगिरी राहण्यासाठी उपाययोजना व सूचना प्रत्येक गावागावात फिरून दिल्या जात आहेत व आठवड्यातून एक दिवस कोरडा पाडवा अशीही सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या व प्रत्येक गावात तील ग्रामपंचायत मार्फत धूळ फवारणी व पिण्याच्या पाण्यामध्ये टी-शर्सेल पावडरचा उपयोग करूनच गावात पिण्यासाठी पाणी सोडावे गावातील पाईपलाईन किंवा प्रायव्हेट नळ कनेक्शन लिकेज असेल तर ते तात्काळ बंद करावे अशेही आव्हान प्रत्येक गावाची ग्रामपंचायत यांना देण्यात आल्या प्रशासन संपूर्णपणे अटल मोडवर असून डेंगू सदृश्य आजाराला आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासन तर्फे सर्व प्रकारची उपाययोजना केली जात असल्याने ग्रामस्थांनी घाबरून न जाता आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी विवेक जैस्वाल यांनी केले आहे त्यांच्यासोबत मोहन तारू आरोग्य सहाय्यक महेश सोनवणे आरोग्य सेवक रवी परदेशी व आशा सेविका उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध