Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपर शहर पो.स्टे.ची मोठी कामगीरी...! विदेशी दारू मालासह मालट्रक वाहन व प्लास्टीक कॅरेट असा एकुण मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद...!
शिरपर शहर पो.स्टे.ची मोठी कामगीरी...! विदेशी दारू मालासह मालट्रक वाहन व प्लास्टीक कॅरेट असा एकुण मुद्देमालासह दोन आरोपी जेरबंद...!
शिरपूर प्रतिनिधी:- आज दि. २०/०९/२०२३ रोजी सकाळी १०.१५ वाजेचे सुमारास शिरपुर शहर पो.स्टे. चे पो. नि. ए. एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वर इंदौरकडुन धुळ्याकडे निळ्या व लाल रंगाची मालबाहु मालट्रक क्र. आर.जे.११ / जी. ए. ६९०६ येत असुन सदर वाहनात अवैध दारूची चोरटी वाहतुक होत असुन सदर मालवाहू गाडीचा शोध घेवुन सापळा लावून बातमीची खात्री करून योग्य ती कारवाई करणे बाबत पोउनि / गणेश कुटे यांना आदेशीत केले.
त्यानुसार पोवनि / गणेश कुटे तसेच त्यांचे सोबत पोउनि / संदिप मुरकुटे, पोउनि संदिप दरवडे व शोध पथकाचे अंमलदार अशांनी दोन पंचासह शहादा फाटा, कळमसरे शिवार शिरपूर जि.धुळे येथे जावुन सापळा लावला असता ११.३० वाजेचे सुमारास सांगवीकडुन शिरपूरकडे मालट्रक वाहन क्र. आर. जे. ११/ जी.ए. ६९०६ असे वाहन येतांना दिसल्याने सदरचे वाहन थांबवुन सदर वाहनाचे चालक व क्लिनर अशांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव रामरूप सोबीराम जाटाब वय २८ वर्षे रा. कानपूर ता. जि. ढोलपूर राज्य राजस्थान व क्लिनर कृष्णकुमार महाविर गुर्जर वय २२ रा. कसवानगर ता. बाडी जि. ढोलपूर राज्य राजस्थान असे असल्याचे सांगितल्याने त्यांना वाहनात काय माल भरला आहे बाबत विचारपूस करता त्यांनी त्यांचे वाहनात खाली कॅरेट भरल्याचे सांगत असल्याने पंचांसमक्ष सदर वाहनाची तपासणी करता वाहनात भाजीपाला ठेवण्याचे रिकामे प्लास्टीक कॅरेट व त्या कॅरेट खाली लपवुन ठेवलेल्या प्लास्टीक कॅरेटमधील कागदी खोक्यांमध्ये अवैधरित्या विनापरवाना एकुण १९,४४,५३०/- रूपये किंमतीच्या रॉयल स्टॅग कंपनीची सुपिरिअर व्हिस्की, रॉयल चॅलेंज कंपनीची फाईन रिझव्ह व्हिस्की, मॅकडॉवल्स नं.१ कंपनीची डिलक्स व्हिस्की, ऑल सिजन कंपनीची गोल्डन कलेक्शन रिझर्व्ह व्हिस्की व ब्लेंडर्स प्राईड कंपनीची रिझर्क कलेक्शन व्हिस्की अशा विदेशी दारूच्या बाटल्यांचा माल भरलेला मिळुन मिळुन आल्याने सदरचा माल तसेच ३५,००,०००/- रूपये किंमतीचे मालट्रक वाहन क्र. आर. जे. ११ / जी. ए. ६९०६ व ९२,७५०/- रूपये किंमतीचे प्लास्टीक कॅरेट असा एकुण ५५,३७,२८०/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून उल्लेखनीया कामगिरी केली आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारासह कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर...!
त्यावरुन बरनमुद वाहनाचे १) चालक नामे रामरूप सोबीराम जाटाब व २) क्लिनर कृष्ण कुमार महाविर गुर्जर असे त्यांचे ताब्यातील मालवाहु मालट्रक वाहन क्र.आर.जे. ११ / जी.ए. ६९०६ या वाहनात विदेशी दारुचा माल हा फक्त पंजाब राज्यात विक्रीसाठी परवानगीचा असल्याचे माहित असतांना तो पंजाब राज्य सोडुन इतर राज्यात विक्री करण्यासाठी मालाचे मालक, मालाचा खरेदीदार, मालाचे पुरवटादार व वाहनाचे मालक यांचे मदतीने कट रचुन सदर मालावरील किंमत, बारकोड व बुचवरील बॅण्ड रोल खोडुन पुरावा नष्ट करून सदर विदेशी दारू मालाची बाजारात विनापरवाना चोरटी विक्री करण्यासाठी वाहनात भरून कब्जात बाळगुन तिची बेकायदेशीररित्या चोरटी वाहतुक करतांना मिळून आल्याने त्यांचेविरूध्द पोकों/योगेश कृष्णा दाभाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म.प्रो.का.क.६५ (अ), ६५ (ई), ८०(१) (२),८३ सह भादंवि कलम २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि / संदिप दरवडे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.ए.एस. आगरकर, पोउनि / गणेश कुटे, संदिप मुरकुटे, संदिप दरवडे तसेच शोध पथकाचे पोहेकॉ / ललीत पाटील, पोना/ रविंद्र आखडमल, पोकॉ/ योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, गोविंद
कोळी, विनोद आखडमल, प्रशांत पवार, सचिन वाघ, भटू साळुंके, आरीफ तडवी, मनोज महाजन, विवेकानंदन जाधव, दिपक खैरनार, भुपेश गांगुर्डे, तसेच होमगार्ड मिथुन पवार, शरद पारधी, राम भिल व चेतन भावसार अशांनी मिळून केली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा