Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २० सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
बचत गट घोटाळा व सावकारी करणाऱ्या अधिकाऱ्याची बॅककडून अंतर्गत चौकशी....! सोसायटी कर्ज भरण्यासाठी वापरला बचत गटाचा पैसा - शेतकऱ्यांची जबानी....!
बचत गट घोटाळा व सावकारी करणाऱ्या अधिकाऱ्याची बॅककडून अंतर्गत चौकशी....! सोसायटी कर्ज भरण्यासाठी वापरला बचत गटाचा पैसा - शेतकऱ्यांची जबानी....!
आमच्या तरुण गर्जना वृत्तसेवे मार्फत मागील महिन्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नामांकित शेतकरी बँकेतील बचत गट घोटाळा बाबत आपण बरेच काही वाचले असेल यात एका सराईत सावकाराने आपल्या शेतकरी बँकेतील नोकरीच्या पदाचा व अधिकाराचा कशा पद्धतीने गैरवापर केला व नाबार्ड तथा बँकेच्या निधीचा सावकारी साठी कसा वापर झाला हे जवळजवळ बँकेला देखील कळून चुकले आहे. मात्र याबाबत अजून देखील या शेतकरी बँकेचे वरिष्ठ अधिकारी ह्या सराईत सावकाराविरुध्द कोणतेही पाऊल का उचलत नाही ? खरे बघितले तर या सावकाराकडे बॅकेतील महत्वाचे पदभार, त्यातच या चारही गटांचे दप्तरी कामकाज देखील त्यांच्याचकडे, मग काय पह्यांचे काम आहे. “सोने पे सुहागा” खरे पाहिले तर या चारही बचत गटाच्या संचालक मंडळ व सचिव यांच्यावर गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे
त्यातच बॅकेच्या शाखाधिकारी यांचा सराईत सावकारावर असलेला विश्वास. पण ह्या शाखाधिका-यांना माहिती नाही का, विश्वास पानिपतमध्ये मेला असे. व यातच बॅकेतील वरिष्ठ अधिकारीचा हुकुमशाही, दडपशाही, जातीयवाद व वशिलेबाजी प्रकारची कामकाज पध्दत, अजून लाळगाळे व पाय चाटणारे यांची वरिष्ठ अधिकारी यांचे पुढे-पुढे करण्याची पध्दत यासर्वाना त्रस्त झालेले बॅकेतील दुखी आत्मे यांच्या आमच्याकडून असलेल्या खुप मोठ्या अपेक्षा यामुळे आम्हास दुखी आत्मांकडून बातमीसाठी देखील उपलब्ध होणारे मुबलक मटेरियल. दुखी आत्म्यांच्या मते तालुक्यातील तालुक्यात बद्ली करुन या अधिका-यांच्या वरिष्ठांकडून बॅक प्रशासनावर आलेला दबाब हे देखील कारण असू शकते. मग दोषींना जागेवरच ठेवले असते, हा देखावा का ? याच ठिकाणी दुसरा कोणी राहिला असता तर त्याला सरळ-सरळ धडगांव, अक्कलकुवाच दावखवले असते ! असे त्यांचे म्हणने आहे. त्यामुळे या बॅकेने आता तरी समजून घेणे गरजेचे आहे. की यावर नेमकी प्रशासकिय की फ़ौजदारी व धडगांव अक्कलकुवा की तालुक्यातच यापैकी नेमकी कोणती पध्दती अवलंबवावी, अन्यथा हे दुखी आत्मे आम्हास मटेरियल देतच राहतील व आम्ही तुमची........….टोकतच राहू.
प्राप्त माहितीनुसार मागील आठवड्यात बँकेच्या अंतर्गत चौकशीमध्ये काही शेतकऱ्यांना देखील बोलवण्यात आले होते व त्यांनी स्पष्टपणे बँकेच्या कुख्यात सराईत सावकाराचे नाव घेऊन सोसायटीचे कर्ज भरण्यासाठी पैसा कोणी दिला व कुठून दिले त्याचा खुलासा चौकशी अधिकाऱ्यांच्या जवळ केला आहे. ज्या अर्थी बचत गटाचा पैसा शेतकऱ्यांना सोसायटी कर्ज भरण्यासाठी वापरण्यात आला, म्हणजे हा पैसा काही फुकट दिलेला नाही. तर त्यावर या कुख्यात सराईत सावकाराने व्याज ही कमवले, आणि आपला धुर्त हेतू देखील साध्य केला. म्हणजेच ख-या अर्थाने त्यात सावकारी झाली हे उघड उघड सत्य दिसून येते.
यात गटाचा सभासद नसलेल्या व्यक्तीच्या नावाने रक्कमा काढण्यात येऊन त्याचा सावकारी व्यवसायासाठी वापर करण्यात आल्या, म्हणजेच सदर या सराईत सावकाराने बॅकेतील आपल्या अधिकाराचा व पदाचा व बचतगट सचिव पदाचा पुरेपुर गैरवापर करत बँक व नाबार्डनिधीचा गैरफायदा घेतला हे सिध्द होते. व हे केवळ याच वर्षी घडले असे नाही, तर हे मागील काही वर्षापासून सुरु आहे. फ़क्त यावेळेस बचत गटाचा पैसा वापरला म्हणुन तो आमच्या हातात सापडला. तब्बल 3-4 वर्षापासून त्यांच्या ह्या कृत्यावर आमची करडी नजर होती. समाजातील काही लोकांना देखील याने बचत गटाचा पैसा व्याजाने दिलेला आहे त्याची देखील चौकशी व्हावी.
अशा या कृख्यात सराईत सावकाराला वठणीवर आणण्यासाठी त्या गटाच्या संचालक मंडळांना शेतकऱ्यांच्या बँकेने बँकनिधी व नाबार्डनिधीचा गैरवापर केला म्हणून आपल्यावर गुन्हे का दाखल करण्यात येऊ नये याबाबत नोटीसा का काढल्या नाहीत ? खरोखर त्यांची याबाबत संमती आहे काय ? असल्यास ते देखील यात दोषी आहेत. व जर याबाबत त्यांना काहीच माहिती नसेल, तर मग संचालक मंडळ हेच संचालक मंडळाला व बचत गटाच्या सभासदांना विश्वासात न घेता केलेल्या स्वार्थी हेतूने, हेतू पुरस्कार गैर कामकाज करून बचत गटासाठी उपलब्ध झालेल्या निधीचा गैरवापर करुन गटाच्या अस्तीत्वाला व अस्मितेला काळिमा फ़ासली म्हणून दप्तरी कामकाज करणाऱ्या कुख्यात सराईत सावकार म्हणजे बचत गटाचा सचिव व त्यालाा साथ देणाऱ्या म्हणजेच चेक वर सही असलेल्या दोन्ही व्यक्ती या पूर्णतः दोषी आहेत म्हणून यावर गुन्हे दाखल करून सराईत सावकाराला त्यांच्या या लाच्छनासपद कामाचे प्रशस्तीपत्र देतील. याला म्हणतात “नाक दाबले की, तोंड उघडते.” यासाठी गटाचे सर्व दप्तर ताब्यात घेण्यात यावे. अंतर्गत चौकशीत गटाची प्रोसिडींग व कॅश बुक ताब्यात घेऊन खाते फ़्रिज केले का ? यामुळे शेतकरी बॅकेला जे तोषीस धरले जात आहे. व त्यासाठी येणारा सर्व खर्च या खात्यातून वसुल करण्यासाठी त्याचे खाते फ़्रिज होणे आवश्यक आहे.
याबाबत शेतकरी बँकेने तात्काळ पुढील पाऊल उचलले नाही तर आम्हाला याबाबत सह्कार आयुक्त, नाबार्ड व मा. अमीत शहा, केंद्रीय सहकार मंत्री यांच्याकडे तशी स्वतंत्र ऑनलाईन व ऑफ़लाईन तक्रार करणे क्रमप्राप्त होईल. याची दखल आतातरी गांर्भीर्याने घ्यावी. यापुढी होणा-या कोणत्याही संभाव्य परिणामास ह्या शेतकरी बॅकेने तयार राहावे. मग कितीही लोक आदालती केल्यात तरी काहीच फ़ायदा होणार नाही, हे मात्र नक्कीच...! कारण हा त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे. असे दुखी आत्म्यांनीच आम्हाला सांगितले असून पुढील पाऊल कोणते घ्यावे हे देखील स्पष्ट केले आहे. व हे दुखी आत्मे आता उघड-उघड बंडावर येऊ पहात आहेत.
बातमी मागील सत्य .....……!
(वाचा पुढील अंकात…....बचत गट घोटाळ्यातील सावकारासह इतर कर्मचारी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता…! शेतक-यांच्या बॅकेतील अजून एक मोठा घोटाळा समोर येण्याच्या मार्गावर….!)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा