Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १४ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
जळगाव जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ तर देशी दारू विक्रीत 2 टक्के घट
जळगाव जिल्ह्यात विदेशी, बिअर, वाईन दारू विक्रीत वाढ तर देशी दारू विक्रीत 2 टक्के घट
जळगाव प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्यात विदेशी दारू विक्रीत 14 टक्के, बिअर 13 टक्के व वाईन 16 टक्के वाढ झाली असून देशी दारू विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. या दारू विक्रीतून महसूलात 34 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात एप्रिल 2022 ते सप्टेंबर 2022 या मागील वर्षाच्या सहामाही दारू विक्री व महसूलाच्या तुलनेत एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहा महिन्याच्या विदेशी, बिअर व कालावधीत दारू विक्रीत वाढ झाली आहे. तर देशी दारू विक्रीत 2 टक्के घट झाली आहे. महसूलात 34 टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. दारू विक्रीतून शासनाला या सहामाहीत 5 कोटी 47 लाखांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मागील वर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर 2022 च्या तुलनेत यावर्षीच्या सहामाहीत महसूलात 1 कोटी 38 लाखांची वाढ झाली आहे.
यामध्ये एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 49 लाख 74 हजार 23 लीटर देशी दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 50 लाख 50 हजार 246 लिटर देशी दारू विक्री झाली होती. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 31 लाख 83 हजार 542 लीटर विदेशी दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 27 लाख 91 हजार 183 लिटर विदेशी दारू विक्री झाली होती.एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 36 लाख 62 हजार 325 लीटर बिअर दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 32 लाख 37 हजार 889 लिटर बिअर दारू विक्री झाली होती. एप्रिल 2023 ते सप्टेंबर 2023 या सहामाहीत 56 हजार 359 लीटर वाईन दारू विक्री झाली आहे. 2022 यावर्षी याच कालावधीत 45 हजार 936 वाईन दारू विक्री झाली होती.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा