Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपुर तालुक्यात एकाच गावात 3 अल्पवयीन मुलींवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना....!
शिरपुर तालुक्यात एकाच गावात 3 अल्पवयीन मुलींवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना....!
शिरपूर प्रतिनिधी - शिरपुर तालुक्यात एकाच गावात 3 अल्पवयीन मुलींवर तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत तिघा नराधमांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहीतीनुसार संशयित दादू ठेलारी,तानू ठेलारी दोघे रा.सतारे ता. शिंदखेडा यांनी साक्री तालुक्यातील इंदिहट्टी येथे देवीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघा पीडितांना रात्रीच्या वेळी यात्रेत आईस्क्रीम खाण्याचे बहाण्याने नेत अत्याचार करीत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.तसेच पोळ्याच्या दिवशी मुलींच्या गावी देवीच्या कार्यक्रमात सर्व मंडळी गेले असतांना व मुली घरी असतांना संशयीत भटू तांबे सह रात्रीच्या वेळी दुचाकीने त्यांच्या वस्तीवर पोहचून पीडित मुली व त्यांच्या सोबत असलेल्या एका मुलीवर धमकी देत अत्याचार करून निघून गेले त्यानंतर 16 सप्टेंबर रोजी पीडित मुली शेतात जात असतांना तिघीना अपहरण करून पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र एक पीडित त्याच्या हातून निसटल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे.
दरम्यान 27 सप्टेंबर रोजी संशयीतांच्या ताब्यातील मुलींना घेण्यासाठी व समज देण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील सतारे येथे गेलेले पालक व नातेवाईकांना संशयीत व त्यांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने जिवाच्या आकांताने पळ काढला लागला.तर संशयितांनी वाहनाचे टायर फोडुन नुकसान केले.
दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला जिल्हा प्रमुख हेमाताई नेमाडे,प्रतिभा सोनवणे संगीता भागवत, कुंदाताई मराठे,बापू साहेब ढेकडे,धनराज सरगर याना पीडित मुलींनी व पालकांनी आपबिती सांगिल्याने दखल घेत रविवारी त्यांनी पीडितांसह शिरपूर शहर गाठून पोलिसांशी चर्चा करून संशयीत दादू ठेलारी,तानू ठेलारी भटू तांबे तिघे रा. सतारे ता.शिंदखेडा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड गावचे रहिवासी तथा काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते वाळू क्षिरसागर यांची नुकतीच काँग्रेस सेव...
-
जळगाव प्रतिनिधी:- नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हादरा बसला आहे. ज...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा