Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
वनक्षेत्रपाल के.डी.देवरे यांच्या उपस्थितीत शिरपूर प्रादेशिक वन विभागात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम....!
वनक्षेत्रपाल के.डी.देवरे यांच्या उपस्थितीत शिरपूर प्रादेशिक वन विभागात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत स्वच्छता मोहीम....!
शिरपूर प्रतिनिधी - दिनांक २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात व समर्पकपणे साजरा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून दिनांक एक ऑक्टोबर रोजी एक टाईम एक तास स्वच्छता मोहीम राबविण्याबाबत जनजागृती करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत दिनांक एक ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता एक तास महा श्रमदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत कचरा मुक्त भारत अभियान राबविण्यात आले असून या अभियानात सर्व सार्वजनिक ठिकाणी सरकारी कार्यालय दवाखाने शाळा अंगणवाडी पर्यटन स्थळ इत्यादी ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आव्हानाला भरभरून प्रतिसाद देत शिरपूर शहरातील प्रादेशिक वनविभाग कार्यालयात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रविवार दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजता वन्यजीव सप्ताह चा पहिला दिवस आणि वन्यजीव सप्ताह व स्वच्छता अभियान कार्यक्रम साजरा केला . यावेळेस या कार्यालयाच्या परिसरातील पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली. या वेळी कार्यक्रमास उपस्थित वनक्षेत्रपाल के.डी.देवरे भारती राजपूत ,कपिल पाटील, दीपिका पालवे,सर्व वनपाल सर्व वनरक्षक राहुल देसले,मनोज पाटील,सोनल मगरे,भारती पावरा, किरण साळुंखे,व ग्रामस्थ यांनी सकाळी 10.00 रेंज कार्यालय शिरपूर येथे शासकीय आवारात श्रमदान करून साफसफाई अभियान राबविले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा