Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३
भोई समाज आदर्श विकास मंडळ शिरपूर यांची विचार विनिमय सभा संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:- दिनांक 15/10/2023 वार रविवार रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता भोई समाज आदर्श विकास मंडळ शिरपूर यांची महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय करणेसाठी भोईराज भवन, आदर्शनगर भोई गल्ली शिरपूर येथे खेळीमेळीच्या वातावरण सभा घेण्यात आली. अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सी. एम. भोई सर यांचे अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष तथा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भाईदास देविदास मोरे आणि अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय सदस्य व तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. श्री. गुलाब बुधा भोई यांचे मार्गदर्शनाखाली आजच्या सभेचे आयोजन करण्यात आलेली होते.
शिरपूर तालुक्यातील भोई समाजाने धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात आपला एक विशिष्ट असा ठसा निर्माण केलेला आहे. अतिशय लहान कार्यक्रमांपासून तो मोठ-मोठ्या विवाह सोहळ्यापर्यंतचे कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडून एक मोठा आदर्श महाराष्ट्रात उभा केला आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम संत भीमा भोई जयंती साजरी करण्याचा मान देखील शिरपूरलाच आहे.
आणि म्हणून दिनांक 27 व 28 डिसेंबर 2023 रोजी तिरुपती बालाजी (आंध्रप्रदेश) येथे होणा-या अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे महाराष्ट्रीय अधिवेशनास शिरपूर चा ठसा राज्याबरोबर बाहेरील राज्यात देखील नावलौकिक मिळावे व ही परंपरा कायम सुरू राहावी यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. या विषयावर विचार विनीमय व चर्चा करण्यात आली. यात श्री सी.एम. भोईसर, भाईदास मोरे व सुभाष भोई यांनी मार्गदर्शन केले तर समाजातील काही उपस्थित बांधवांनी देखील यावर अनमोल असे सल्ले दिले. तालुकाध्यक्ष श्री. रवींद्र सोनवणे यांनी उपस्थित सर्व समाज बांधवांचे आभार प्रदर्शन करीत सभा संपल्याचे जाहीर केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा