Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ ऑक्टोबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... कुंभारटेक परिसरातून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... कुंभारटेक परिसरातून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने सोशल मीडियावरून पोस्ट व्हायरल
शिरपूर प्रतिनिधी-इंस्ट्राग्राम अकाउंटवरन शहरात धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतुने पोस्ट व्हायरल केल्याच्या संशयावरून शहर पोलीस ठाण्यात इंस्टाग्राम आयडी धारकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी वैभव रामेश्वर सोनवणे वय २३ रा.मातोश्री कॉलनी शिंगावे शिवार, शिरपूर यांनी तक्रार दाखल केली आहे
दाखल तक्रारीनुसार ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी साडे ५ वाजेच्या सुमारास शहरातील कुंभारटेक परिसरात King lala ३०२ या इंस्टाग्राम आयडी धारकाने धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने त्याचे मोबाइल मधील इंस्ट्राग्राम अकाउंटवर जय मातादी सांस्कृतीक मित्र मंडाळाच्या गणपती विसर्जनाच्या व्हिडीओमध्ये छेडछाड करून हिंदु धर्माचे देवतांविषयी आक्षेपार्य पोस्ट तयार करून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न करुन जन माणसात एकोपा टिकवण्यास बाधक कृत्य करण्याच्या हेतुने King lala ३०२ या इंस्टाग्राम आयडी धारक व्यक्तीने फिर्यादी यांना मेसेज पाठवला. हिंदू संस्कृती व देवी देवतांविषयी अश्लील भाषेत उल्लेख करुन समस्त हिंदु धर्माच्या भावना दुखावल्याने तसेच इंस्ट्राग्राम अकाउंटमध्ये बदल करुन पुरावा नष्ट केल्याची तक्रार शनिवारी दाखल केली दाखल तक्रारींवरुन इंस्ट्राग्राम अकाउंटववरील King lala ३०२ इंस्टाग्राम आयडी धारकाविरुद्ध भादंवि च्या व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर करीत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा