Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई....! चोपडा तालुक्यात 32 लाखांचा 795 किलो गांजा जप्त....!
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई....! चोपडा तालुक्यात 32 लाखांचा 795 किलो गांजा जप्त....!
चोपडा प्रतिनिधी :-२५ नोव्हेंबर २०२३ चोपडा तालुक्यातील उत्तमनगर गावात तुरीचा शेतात गांजाच्या शेतीचे कारस्थान पोलिसांनी उधळून लावले आहे. पोलिसांनी येथे छापा मारत दोन ट्रॅक्टर भरून ३२ लाखांचा ७९५ किलो गांजा जप्त केला आहे. यातील मुख्य संशयित पसार झाला असून त्याच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील उत्तमनगर येथील रहिवासी रवी किलाऱ्या पावरा(२५) याने स्वतःच्या तुरीच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड केली असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी पोलिसांनी सापळा रचत दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास शेतात छापा टाकला. यात तुरीच्या शेतामध्ये आंतरपीक असलेले ओला गांजाची झाडे कापून सुमारे ८ क्विंटल वजन असलेला ३२ लाख रुपये किंमतीचा ओला गांजा आढळून आला. पोलिसांनी कारवाई करत तो जमा केला.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा