Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
मध्यप्रदेश राज्यातून चणादाळ घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने तापी नदी पात्रात घेतली जलसमाधी...!
मध्यप्रदेश राज्यातून चणादाळ घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने तापी नदी पात्रात घेतली जलसमाधी...!
शिरपूर प्रतिनिधी:- आज दि 26 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मध्यप्रदेश राज्यातून चणादाळ घेऊन धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने तापी नदीत पडल्याची घटना घडली आहे.सदर ट्रक इंदौर होऊन कर्नाटक कडे जात होता .
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदीपुलावर मध्यप्रदेश कडून धुळ्याकडे जाणाऱ्या एम.पी.09एच एच 6167 क्रमांकाची ट्रक तापी नदीत कोसळल्याची घटना दुपारी 4 ते 4:30 वाजेदरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांसह नरडाणा पोलीस स्टेशनचे भरत चव्हाण व पोलीस कर्मचारी तर शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर पीएसआय गणेश कुटे, पिएस आय संदीप दरवडे शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.चालकाने सदर ट्रक सावळदे येथे चहापाणी साठी थांबवली होती.यावेळी क्लिनर कालु पटनाकर हा तेथेच थांबला व चालक अनिल मदन बडोले रा उपडी खरगोन मध्यप्रदेश वय 32 हा ट्रक घेऊन धुळ्याकडे निघाला होता.यावेळी सावळदे तापी पुलावरुन ट्रक जात असतांना ट्रक थेट तापी नदीत कोसळला.ट्रकमध्ये नेमक काय होते ? ट्रक कुठे जात होता. याबाबत पोलीसांकडून व शिरपूर टोल नाका कर्मचारींकडून चौकशी सुरु आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा