Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २७ नोव्हेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री शहरातील धाडसी चोरीसह अपहरण झालेल्या तरुणीला शोधण्यात साक्री पोलीस स्टेशनला मिळाले यश
साक्री शहरातील धाडसी चोरीसह अपहरण झालेल्या तरुणीला शोधण्यात साक्री पोलीस स्टेशनला मिळाले यश
साक्री प्रतिनिधी:- काल साक्री शहर येथील अत्यंत रुदय हेलावून टाकणारी घटना घडली श्री शेवाळे यांच्या राहत्या घरी चोरांनी धाडसी चोरी करत एका 23 वर्षे युवती चे अपहरण करून सोबत काही रोकड व दागिने यांची ही चोरी करण्यात आली.काल सकाळी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता साक्री पोलीस स्टेशनचे पी.आय.श्री निकम साहेब यांनी आपल्या सर्व टीमला घेऊन घटनास्थळी दाखल झाले व तपासला गती दिली तसेच धुळे येथील नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत दिवरे साहेब यांनीही घटनेची दखल घेत सर्व तपास यंत्रणेला कामाला लावले.त्यानंतर 24 तासाच्या आत म्हणजेच आज सकाळी सदर तरुणी ही पोलिसांना मध्यप्रदेश येथील सेंधवा येथे आढळून आली त्यानंतर साक्री पोलीस स्टेशनची एक टीम त्या तरुणीला घेण्यासाठी मध्य प्रदेशातील सेंधवा येथे पाठवण्यात आली व त्या मुलीला आपल्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात पोलिसांना यश आले.
सर्व पोलीस स्टेशन साक्री चे कर्मचारी आणि धुळे पोलीस दलाच्या गुप्तचर यंत्रणांनेचे मनापासून धन्यवाद
मात्र चोरांचा तपास अजून पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे लवकरच पोलीस यंत्रणेला या चोरांना पकडण्यात देखील यश येईल असे साक्री तालुक्यातील सर्वसामान्य म्हणून बोलले जात आहे या सदर घटनेमधून सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे कुठल्याही संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे जागरूक नागरिकांचे देखील काम आहे पोलीस यंत्रणेला देखील नागरिकांनी सहकार्य करावे असे पोलीस विभागाकडून आवाहन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा