Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २० नोव्हेंबर, २०२३
जरांगे यांची सभा आयोजकावर गुन्हे दाखल? मराठा समाजाकडून तीव्र निषेध व्यक्त !!!
भूम (राहूल शिंदे) दि.२० तालुक्यातील ईट येथे (दि.१५) रोजी मराठा आरक्षण विषयी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा आयोजत केली होती. या सभेला परवानगी घेतली नसल्याने सभा आयोजीत करणारे आयोजक संदीपान कोकाटे व अप्पासाहेब देशमुख यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधकारी डॉ.सचिन ओंबसे यांनी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले असतानाही सभा घेतल्याचा आरोप आहे. कलम १८८ सह मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अन्वये वाशी पोलीसस्टेशन गून्हा नोंद करण्यात आला आहे.
यामुळे मराठा समाजात सरकार विषयी असणाऱ्या भावना अतिशय तीव्र व संतापजनक होताना दिसत आहेत. या घटनेचा मराठा समाजाकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात येऊ लागला आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा