Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २९ डिसेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
सारंगखेडा यात्रेत घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून साडेतीनशे वर्षाची पंरपरेची प्रतिमा मलिन केली
सारंगखेडा यात्रेत घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून साडेतीनशे वर्षाची पंरपरेची प्रतिमा मलिन केली
सारंगखेडा यात्रा जगप्रसिद्ध यात्रा असून घोडेबाजार मुळे ( चेतक फेस्टिव्हल ) अधिकच महत्त्व प्राप्त होते परंतु शेकडो वर्षांच्या यात्रेच्या परंपरेत घोडेबाजार पाहण्यासाठी कधीच तिकीट लावले नाही मात्र यावर्षी 30 रू शुल्क आकारून सारंगखेडा यात्रेची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू आहे. सारंगखेडा ग्रामपंचायतीने हात झटकले मग दररोज हजारोंच्या संख्येने घोडे पहायला आलेले यात्रेकरूंचे 30 रू तिकीटाचे पैसे कोणाच्या घश्यात जात आहे ? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहरांपेक्षा खेडेगावातील नागरिकांनाच जास्त उत्सुकता असते सांरगखेडा यात्रेची खेडेगावातील नागरिकांना डिसेंबर महिना आला तर आवर्जून सारंगखेडा यात्रेची वाट पहात असतात.यावर्षी पाण्याने पाठ फिरवली अवकाळी पावसाने शेतकरी हवाईदिल झाला कापसाला व कांद्याला भाव मिळत नाही.महागाई ने सर्वसामान्य लोकं बेहाल झाले आहेत.एक दिवसांसाठी का होईना पण शेतकरी वर्ग आपल्या परिवारासोबत सांरगखेडा यात्रेच्या आनंद घेत असतो घोडेबाजार पाहण्यासाठी 30 रू शुल्क आकारून एकप्रकारे चेष्टाच केली सर्वसामान्य जनतेची लोकांच्या सहभाग असलेल्या ठिकाणी शासन महसूल गोळा करते मात्र सारंगखेडा ग्रामपंचायतीने आमच्या कुठलाही संबंध नाही मग महसुलीचा नावाखाली वसुलीचा मेवा कोण खात आहे ? घोडे बाजाराशी संबंधित चेतक फेस्टिव्हल समितीने जर निर्णय घेतला असेल तर याला जिल्हाधिकारी यांची मंजुरी घेतली आहे का ? परवानगी घेतली असल्यास त्या आशयाचे फलक मुख्य प्रवेशद्वाराला लावले आहे का ? असे विविध प्रश्न सर्वसामान्य नागरिकांचा मनात भेडसावत आहे पण यावरून एक गोष्ट मात्र निश्चित सांरखेड्याची यात्रेची प्रतिमा मात्र मलिन होत आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा