Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जानेवारी, २०२४
शिरपूरात २८ रोजी हृदय रोग चिकित्सा मार्गदर्शन शिबीर....
शिरपूर : शिरपूर शहरासह तालुक्यातील पत्रकार , शिरपूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी , माजी सैनिक व नगरपालिका कर्मचारी तसेच जेष्ठ नागरिक संघ यांच्यासह परिवारातील सदस्यांकरिता शिरपूर तालुका मराठी पत्रकार संघ व ललित स्वीट ॲंड गणेश ट्रेडिंग कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य २८ जानेवारी रोजी विनामूल्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
यादरम्यान रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिरात धुळे शहरातील हृदय रोग तज्ञ डॉ.हर्षद सुराणा हे तपासणी करतील व पुढील उपचार संदर्भात मार्गदर्शन करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले
हृदयाची मोफत तपासणी डॉक्टर हाऊस रवी मेडीकल वरवाडे , रोड शिरपूर येथे सकाळी १० ते ३ वाजेच्या दरम्यान होईल
पत्रकार बांधव , पोलिस प्रशासन , माजी सैनिक , नगरपालिका कर्मचारी व जेष्ठ नागरिक संघ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन शिरपूर तालुका मराठी संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सचिव लक्ष्मण बडगुजर , ललित जैन ( पत्रकार ) गणेश कोचर ( पत्रकार ) यांनी केले आहे
नाव नोंदणी साठी संपर्क नंबर
🔳9923491755 / 8218880759
डाॅक्टर हाऊस रवी मेडीकल
🔳9822293592 , राजेंद्र पाटील
साप्ताहिक खान्देश पथक, संपादक ( शिरपूर )
🔳9422233294 , लक्ष्मण बडगुजर
शिरपूर तालुका मराठी पत्रकार संघ सचिव
🔳9763513121 , ललित जैन
साप्ताहिक लोकाभिमुख मुख्य संपादक ( शिरपूर )
🔳8888965296 , गणेश जैन ( पत्रकार )
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा