Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २३ जानेवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शेनपुर येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शेनपुर येथे अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
काल दिनांक 22 एक २०२४ रोजी मौजे शेणपूर येथे अयोध्येतील प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव निमित्ताने भव्य अशी शोभायात्रा शेणपूर येथील हरिभक्त पारायण मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या दिव्य अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रभू रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढण्यात आली प्रत्येक घरोघरी प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करून टाळ मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्रांचे गीत भजन करून सोहळ्याची शोभा वाढवण्यात आली गावातील सर्व नागरिक अबाल वृद्ध महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या शेणपूर येथील हभप भजनी मंडळ व बजरंग मित्र मंडळ तसेच शंकर महाराज मित्र मंडळ या कार्यक्रमात आपले मोठे योगदान दिले यावेळी मंदिरात प्रभू रामचंद्रांची महाआरती गावातील सरपंच सौ अनिता नंदकुमार काकुस्ते व सरपंच पती नंदकुमार हरी काकुस्ते यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी गावातील राम भक्तांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले तसेच गावातील सर्व मंदिरांची स्वच्छता करून विद्युत रोशनी करण्यात आली अखंड हिंदुस्थानातील हिंदूंच्या गेल्या पाचशे वर्षांपूर्वीच्या वादग्रस्त विषयावर अखेर भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हिंदूंना अखेर न्याय मिळवून दिला या पार्श्वभूमीवर अखंड हिंदुस्तानात प्रभू रामचंद्रांचा दिमाखदार सोहळा सर्व भारतीयांनी अनुभवला कालचा 22 जानेवारी 2024 हा दिवस अखंड हिंदुस्थानात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल असा दिवस होता देशातच नव्हे तर परदेशातील हिंदूंनी आपला डंका वाजवला आहे हे केवळ भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच शक्य झाले आहे हे नाकारता येणार नाही काल पासून भारत हे हिंदू राष्ट्र झाले असे म्हणायला हरकत नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा