‘‘सावित्रीबाईंच्या अथक प्रयत्नांनंतरही आजसुद्धा समाजातल्या काही घटकांच्या सडक्या मानसिकतेमुळे मुलींना पंख असूनही भरारी घेता येत नाही,क्षमता असूनही ती दाखवण्याची संधी मिळत नाही.समाजातील विकृत घटकांमुळे मुलींवर बंधने लादली जातात.ग्रामीण भागातल्या अशा बऱ्याच मुली आहेत, ज्या शिक्षणासाठी आजही घरच्यांशी लढत आहेत, तर काही जणी घरच्यांच्या मागास विचारसरणीला बळी पडून आपल्या स्वप्नांवर पाणी सोडत आहेत. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे शस्त्र आहे. आर्थिक परावलंबन व्यक्तीला दुबळे करून व्यक्तीचा कणाच पोकळ करून टाकते, त्यामुळे प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे आहे.अशा वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, नोकरीसाठी खूप धडपड करावी लागते.’’
-डॉ.मोनिका काळे
Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ३ जानेवारी, २०२४
सनराईज स्कूल येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्सहात साजरी...
परंडा (राहूल शिंदे) दि.३ तालुक्यातील सनराईज इंग्लिश मेडीयम स्कूल शेळगाव येथे स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगावच्या डॉ.मोनिका काळे या होत्या तर प्रमुख पाहुणे गवली सिस्टर व लंका शेवाळे या होत्या.सर्वप्रथम मुख्याध्यापक संभाजी देवकर व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
प्रकाश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले, मुख्याध्यापक देवकर यांनी प्रास्ताविक केले तर श्रीम.किर्ती गांगर्डे,श्रीम.सुरेखा शेळके, श्रीम.लोमटे,श्रीम.बोराडे,तानाजी आमटे व विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.तर राहूल शिंदे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या वेशभूषेत आलेले विद्यार्थी.
कार्यक्रमाच्या शेवटी पालक जरांडे पाटील यांनी सर्व विद्यार्थ्याना केळी वाटप केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी सूर्यकांत औताडे, संतोष भिल्लारे, महादेव भोगील,अशोक कसबे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा