योग प्रशिक्षकांना प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून,आमंत्रीत करण्याची ही पहिलीच वेळ असुन,संपुर्ण देशातून ठाराविक योग प्रशिक्षकांना यासाठी निवडण्यात आले आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे.या निवडी बद्दल जिल्हाभरातून आमचे कौतुक होत आहे.
-संतोष शिंदे, योग प्रशिक्षक परंडा
Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १३ जानेवारी, २०२४
योग प्रशिक्षक संतोष शिंदे यांचा, व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने सत्कार...
आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातून तीन योग प्रशिक्षकांची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून निवड..
परंडा (राहूल शिंदे)दि.१३ शासकीय विश्रामगृह येथे,पत्रकार तथा योग प्रशिक्षक संतोष शिंदे यांची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याबाबत सविस्तर वृत्त असे की,
दिल्ली येथे दि.२६ रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ११ योग प्रशिक्षकांची निवड आयुष मंत्रालय,भारत सरकार यांच्याकडून करण्यात आली आहे.यापैकी धाराशिव जिल्ह्यातून तीन योग प्रशिक्षकांची प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून निवड झाली आहे.यामध्ये संतोष शिंदे आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र डोंजा ता.परंडा, प्रशांत साठे आयुष आरोग्यवर्धीनी केंद्र उळुप ता .भुम, अश्विनी ढेरे आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र चिलवडी ता.धाराशिव यांचा समावेश आहे.
यावेळी व्हाईस आॕफ मीडियाचे मुजीब काझी, आप्पासाहेब शिंदे,प्रकाश काशीद,राहुल शिंदे, रावसाहेब काळे,तानाजी घोडके आदि उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : तालुक्यातील गांधली येथील १० रोजी बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह १२ रोजी विहिरीत आढळून आल्याची घटना उघडकीस आली. गांधली येथील जयश्र...
-
अमळनेर :- दोन मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन चोपडा तालुक्यातील घुमावल येथील एक जण जागीच ठार झाल्याची घटना 12 रोजी दुपारी 12 वाजता तालुक्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा