Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३० जानेवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
वाडी बु. गावातील स्ट्रीट लाईट गेल्या सहा महिन्यांपासून बंदचं. वाडी बु. गावातील स्ट्रीट लाईट त्वरित चालू करा - भरत भिल
वाडी बु. गावातील स्ट्रीट लाईट गेल्या सहा महिन्यांपासून बंदचं. वाडी बु. गावातील स्ट्रीट लाईट त्वरित चालू करा - भरत भिल
बोराडी ता.शिरपूर वार्ताह : वाडी बु गावातील स्ट्रीट लाईट त्वरित चालू करण्याबाबत भरत भिल यांनी सांगितले.
वाडी बु गावातील स्ट्रीट लाईट अनेक महिने झालेत बंदचं आहेत. अनेक वेळा पाठपुरावा केला असता ग्रामसेवकांमार्फत अशी माहिती सांगण्यात आली आहे की स्ट्रीट लाईट चे बील भरले नाही म्हणून विद्युत पुरवठा बंद केला आहे. स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे रात्री अपरात्री महिलांना, वृद्ध व्यक्ती, मुलांना बाहेर पडणे मुश्किल व धोकादायक झाले आहे विठ्ठल मंदिर रोड वर स्ट्रीट लाईट नसल्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात ही झाले आहेत याची जबाबदारी कोणाची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
वाडी बु ग्रामपंचायतीने स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या निधीमधून अनेक भागांमध्ये वाड्या-वस्त्यांवर ती स्ट्रीटलाइट बसवण्यात आली आहेत. परंतु वाडी येथील जवळपास सर्वच स्ट्रीट लाईट बंद आहे. हे दुरुस्त केले जात नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. बंद असलेल्या स्ट्रीट लाईट त्वरित दुरुस्त करून चालू करण्यात याव्यात अन्यथा 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वा.वाडी बु येथील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहोत,असा इशारा भरत भिल यांनी दिला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा