Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
रेल्वे मंत्रालयाकडून धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात 716 कोटी रुपयांची 56 किलोमीटर साठी निविदा मंजूर....खा.सुभाष भामरे
रेल्वे मंत्रालयाकडून धुळे मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी पहिल्या टप्प्यात 716 कोटी रुपयांची 56 किलोमीटर साठी निविदा मंजूर....खा.सुभाष भामरे
धुळे : मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाच्या पहिला टप्प्यातील बोरविहीर (ता.धुळे) ते नरडाणा (ता. शिंदखेडा) या ५६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गासाठी ७१६ कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली आहे. जोधपूर येथील एच.जी.इन्फो इंजिनिअरिंग कंपनीला हे काम मिळाले आहे.ते३६ महिन्यांत पूर्ण करावे लागेल.यात रूळ आंथरणीच्या कामाला लवकरच सुरवात होईल.
बोरविहीर ते नरडाणा मार्गादरम्यान सात स्थानके विकसित केली जातील.तथापि, धुळे व शिंदखेडा तालुक्यांतील २५ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे.
मनमाड-मालेगाव-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाची मागील ४० वर्षांपासूनची मागणी आहे. हा रेल्वेमार्ग लवकर कार्यान्वित होऊन त्याद्वारे जिल्ह्यासह खानदेशाच्या विकासाला चालना मिळणे अपेक्षित आहे. या रेल्वेमार्गासाठी अनेकांनी आंदोलने केली, विविध स्तरांवर प्रयत्न झाले.
सात स्थानकांचा विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने २०१४ मध्ये या मार्गाची पायाभरणी केली.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते १६ फेब्रुवारी २०१९ ला मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्ग प्रकल्पाचा शिलान्यास झाला होता. पहिला टप्पा म्हणून बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गाचा श्रीगणेश केला आहे.
यासाठी धुळे आणि शिंदखेडा तालुक्यांतील २५ गावांतील भूसंपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. बोरविहीर ते नरडाणा रेल्वेमार्गावर बोरविहीर,न्यू धुळे,बाळापूर,निमखेडी,कापडणे,सोनगीर, नरडाणा ही सात स्थानके विकसित केली जातील. रेल्वे मंत्रालयाने या कामासाठी ७१६ कोटींच्या निविदेला मान्यता दिली आहे.
कनेक्टिव्हिटीत वाढ
धुळे हे रेल्वेच्या सेंट्रल लाईनवर, तर नरडाणा हे वेस्टर्न लाईनवर आहे.धुळे-नरडाणा हा मार्ग वेस्टर्न लाईनवर आहे.धुळे-नरडाणा हा मार्ग वेस्टर्न आणि सेंट्रल लाइनला जोडणारा दुवा ठरणार असून, जिल्ह्यासाठी तो खूप महत्वाचा ठरेल.हा भाग रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढविणारा आहे.या भागात मुंबई-आग्रा,नागपूर-सुरत तसेच धुळे-सोलापूर, दोंडाईचा-मालेगाव, साक्री-पिंपळनेर-नामपूर-देवळा व सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अंकलेश्वर,असे सहा राष्ट्रीय महामार्ग आहेत.
आता नवीन रेल्वेमार्ग पूर्णत्वास आल्यानंतर दळणवळण आणि वाहतुकीसाठी मोठ्या मदत होईल.महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठीच्या दृष्टिकोनातून हा रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा ठरेल, असे खासदार डॉ.सुभाष भामरे यांनी सांगितले.
"बोरविहिर ते नरडाणा पहिल्या टप्प्यातील रेल्वेमार्गासाठी ७१६ कोटींच्या निविदेला मान्यता मंजुरी मिळाल्याने कामास सुरवात होईल.यामुळे जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. औद्योगिक कॉरिडॉरमध्ये फूड प्रोसेसिंगसाठी धुळे जिल्ह्याची दुसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे.त्यामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरसाठी हा मार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे "डाॅ. सुभाष भामरे, खासदार, धुळे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा