Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४
शिरपूर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी....! अवैध गुटख्याची तष्करी रोखली....
शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर तालुका पोलिसांची दबंग कामगिरी पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी ठाण्याचा चार्ज घेताच हायवेवरील अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे.अवैध गुटखा माफियांना टार्गेट करून आपला दरारा निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या याच कामाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कौतुक केले आहे.
आपल्या कार्यात तत्पर असलेले व खबऱ्यांचे मोठे नेटवर्क असलेल्या पीआय पवार यांना हायवेवर गुटख्याची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार 31 जानेवारीला रात्री वरिष्ठांच्या आदेशाने हाडाखेड येथील चेक पोस्टवर नाकाबंदी करण्यात आली. रात्री पावणे अकराला सेंधव्याकडून शिरपुरकडे येणारे वाहन क्र.M.H 43 CE O950 ला थांबण्याचा इशारा केला असता चालक आणि क्लिनरने ट्रक सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अनुप दिलीपकुमार शुक्ल याला ताब्यात घेतले.व ट्रक जप्त करून सांगवी पोलिस ठाण्यात नेऊन झडती घेण्यात आली.
सदर ट्रकच्या झडतीत 13 लाख 65 हजार रुपये किमतीची बनारसी आशिक सुपारी,विना नावाची सहा लाख 72 हजार रुपयांची तंबाखू, दोन लाख एक हजार 600 रुपये किमतीची मिरज सुगंधित तंबाखू आढळली. ट्रकसह या मुद्देमालाची किंमत 37 लाख 38 हजार 600 रुपये आहे.
पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एक फेब्रुवारीला सकाळी सांगवी येथे जाऊन पोलिसांचे कौतुक केले. श्री धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, डीवायएसपी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, उपनिरीक्षक कृष्णा पाटील, हवालदार संतोष पाटील, संदीप ठाकरे, मोहन पाटील, योगेश मोरे, संजय भोई, स्वप्निल बांगर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
© डॉ. दिलीप तिवारी पाळधी - तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाचा तरसोदकडील भागाचा उजवीकडील भराव कोसळून तीन महिने होत आले आहेत. तेथील दुरुस्तीच्या क...
-
माधव खाबिया:- वणी पोलीस ठाणे जिल्हा नाशिक यांचेकडील पोलीस ठाण्यात गुरन व कलम सि.सि.टी.एन.एम. गुरनं २९८/२०२६ भा.न्या.सं. कलम ३१०(२) प्रमाणे ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा