Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ फेब्रुवारी, २०२४
वाडी बु येथे मुख्य रस्त्यावर उकिरड्यांचे साम्राज्य....!
शिरपूर (वार्ताहर) - एकीकडे शासन हे स्वच्छ गाव,सुंदर गाव व संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान ही संकल्पना राबवत आहे व दुसरीकडे वाडी बु ग्रामपंचायतीने अस्वच्छतेचा कळस गाठला आहे वाडी - शिरपूर रस्ता पूर्ण दुर्गंधीयुक्त बनला असून रस्त्यावरून ये- जा करणाऱ्या नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
वाडी बु गावात दुर्गंधीयुक्त घाणीच्या साम्राज्य निर्माण झाले आहे. वाडी येथून शिरपूर कडे जाणारा मुख्य रस्ता असून येथून ग्रामस्थ व विद्यार्थी, शिरपूर व बोराडी कडे ये - जा करणाऱ्या प्रवाशांसाठी जाण्या- येण्यासाठी हा एकमेव जवळचा मार्ग असल्याने नागरिकांची या रस्त्यावर सततची वर्दळ आसते. हा रस्तावर पूर्णपणे उकिरड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.व मुख्य रस्त्यावर उकिरड्यांतुन वाट काढत वाहन चालवावे लागते.गावलागतच्या मुख्य रस्त्यावर वाडी गावातील कानाकोपऱ्यात चिकन कटाईचा व्यवसाय करणारे बॉयलर कोंबड्यांचे पंख,खराब मांस रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला बिनधास्तपणे फेकले जात आहे.
तसेच हे सर्व वाडी बु ग्रामपंचायतीच्या शंभर ते दिडशे मीटरच्या अंतरावर असल्याने ग्रामीण प्रशासनातर्फे या भागातील लोकांना रात्री बेरात्री घाण पाण्यातून ये जा करावी लागत आहे तसेच सदर ठिकाणी डासांची उत्पत्ती करिता पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राम पंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देवून योग्य ती उपाय योजना करावी तसेच ज्या व्यक्तीचा उकिरडा आहे त्याला नोटींस देण्यात यावी व उकिरडा उचलण्यात यावा अशी मागणी नागरीकांकडून होत आहे..
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा