Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
अमळगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा... डॉ. किरण गुजराथी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर...!
अमळगावाच्या शिरपेचात मानाचा तुरा... डॉ. किरण गुजराथी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर...!
अमळगाव चे भुमिपुत्र आणि शिरपुर तालुक्यात गरिबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.किरण गुजराथी सर यांना नुकताच नाशिक येथील महालक्ष्मी मध्यवर्ती मंडळाचा प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला... हा दिखामदार सन्मान सोहळा नाशिक येथे पार पडला.
डॉ.किरण गुजराथी सर यांचे अमळगाव शी दुहेरी नाते असुन ते अमळगाव चे सुपुत्र भुमिपुत्र असुन सरांच्या पत्नी देखील अमळगाव च्याच भुमिकन्या आहेत... डॉ किरण गुजराथी सरांनी शिरपुर तालुक्यात आर्थे व पंचक्रोशीतील आदिवासी बहुल क्षेत्रात सलग 43 वर्षे अविरत वैद्यकीय सेवा दिली असुन लोकांमध्ये गरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध आहेत... डॉ. किरण गुजराथी सरांनी लोकसेवेचे प्रज्वलित केलेले यज्ञकुंड त्यांचे सुपुत्र डॉ अमित गुजराथी व डॉ अमोल गुजराथी सरांनी धगधगित ठेवले असुन सिद्धीविनायक हॉस्पिटल मार्फत लोकांच्या सेवेचे व्रत अहोरात्र चालवित आहेत...एवढेच नव्हे डॉ किरण गुजराथी सरांच्या दोन्ही सुना देखील डॉक्टर असुन रूग्ण सेवा करित आहेत... डॉ. किरण गुजराथी सर हे गरिबांचे डॉक्टरच नाहीत तर शिरपुरचे बाबा आमटे म्हटले पाहिजे एवढी चांगली रूग्ण सेवा त्यांचे कुटुंब चालवित आहे...डॉ..गुजराथींचा झालेला सन्मान अमळगाव चा मान वाढवून गेला असुन अमळगाव ग्रायस्थांमधुन आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा