Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २६ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
शेनपूर फाट्या लगत विद्युत पोल लाइट् चा लोकार्पण सोहळा धुळे जिल्हा भाजप उपाध्यक्ष भैय्यासो चंद्रजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न...!
शेनपूर फाट्या लगत विद्युत पोल लाइट् चा लोकार्पण सोहळा धुळे जिल्हा भाजप उपाध्यक्ष भैय्यासो चंद्रजीत पाटील यांच्या हस्ते संपन्न...!
साक्री तालुक्यातील शेणपूर येथे काल दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी शेणपूर गावापासून तर शेणपुर फाटा पर्यंत विद्युत LED लाइट्स पोल बसवण्यात आले आहेत त्याचा लोकार्पण सोहळा काल सायंकाळी सात वाजता करण्यात आला यावेळी या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन भाजपचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष व साक्री तालुका विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष माननीय भैय्यासाहेब चंद्रजीत सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास शेनपुर गावातील ज्येष्ठ नागरिक,तरुण,मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शेणपुर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य पोलीस पाटील ग्रामपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.शेणपूर गावातील सरपंच प्रतिनिधी दीपक काकुस्ते यांनी या कामासाठी विशेष प्रयत्न करून हे काम त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने झाले आहे असेही म्हणता येईल तसेच येणाऱ्या काळात उर्वरित विद्युत पोल चे काम हे एक महिन्यात पूर्ण करणार असल्याचेही सरपंच प्रतिनिधी यांनी सांगितले शेणपूर गावासाठी हे अविस्मरणीय असे काम ठरणार आहे यापूर्वी शेण पूर फाट्यावर रात्री अपरात्री गावात फाट्यापासून पायी येणारे लोकांसाठी भीती चे वातावरण असायचे आता हे लाइट्स लागल्यामुळे महिला बालके तरुण ज्येष्ठ नागरिक या सर्वांनाच रात्री व पहाटे वॉकिंग ला जाण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे तसेच शेतकऱ्यांना रात्री पहाटे आपल्या शेतात जाण्यासाठी व जंगली जनावरे व प्राण्यांपासून संरक्षणासाठी याचा मोठा उपयोग होणार आहे हल्लीच्या काळात जंगली प्राण्यांचा वावर हा वाड्या वत्यांपर्यंत पोहोचला आहे त्या अनुषंगाने लाईट्स लावल्यामुळे मानवी वस्तीकडे जंगली प्राण्यांचा वावर कमी होण्यास देखील मदत होईल येणाऱ्या काळात देखील गावासाठी अजूनही अनेक विकास कामे करण्याचा आमचा मानस आहे असे शेंनपूर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य सरपंच व उपसरपंच यांच्यावतीने श्री.दीपक काकुस्ते यांनी गावकऱ्यांना आश्वासित केले केले.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा