Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करणारा प्रांत कार्यालयाचा चालक व खाजगी पंटर नाशिक एसीबीच्या जाळ्यात....!
अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करणारा प्रांत कार्यालयाचा चालक व खाजगी पंटर नाशिक एसीबीच्या जाळ्यात....!
शिरपूर प्रतिनिधी:- महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळू ट्रॅक्टर वरील दंड भरून देखील ट्रॅक्टर सोडण्यासाठी २० हजारांची लाचेची मागणी करणाऱ्या शिरपूर प्रांत कार्यालयातील चालकासह खाजगी पंटरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार तक्रारदार यांच्या अवैध वाळू वाहतूकीचे ट्रॅक्टरवर डिसेंबर २०२३ साली महसूल विभागाने जप्त केला होता. या जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टर वर दंड आकारण्यात आला होता. सदर दंड तक्रारदार यांनी भरुन देखील ट्रॅक्टर सोडण्यास नकार देऊन २० हजारांची मागणी करण्यात आली. यात तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत
प्रतिबंधक विभागाच्या पथकाला तक्रार केली.या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची सहानिशा करुन तक्रारदाराकडे २० हजारांची मागणी करण्यात आल्याचे दिसून आले त्यावरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खाजगी इसम आणि प्रांताधिकारी कार्यालयातील
शासकीय चालक मुकेश विसपुते व बॉबी सनेर याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी विद्युत तारांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली आल्यामुळे गांधीनगर टॉवर गल्ली येथे एका तरुणाचा मृत...
-
माधव खाबिया नाशिक - आपल्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे 'लेडी सुपरकॉप' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा