Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष भोई यांची नियुक्ती...!
धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेच्या प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष भोई यांची नियुक्ती...!
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुक्यातील सडेतोड व अत्यंत निर्भीडपणे वृत्त प्रकाशित करणारे तरुण गर्जना वृत्तपत्राचे मुख्य संपादक संतोष गंभीर भोई यांची वेगवेगळ्या सामाजिक तसेच टोल कामगारांच्या संघटनांमध्ये काम करीत असताना टोल कामगारांसाठी वेळोवेळी दिलेला लढा, दिलेली निवेदने व तक्रारी या सर्व कामांची दखल घेत धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या सभेत अध्यक्ष श्री.निलेश राजाराम पाटील व इतर संघटनेचे पदाधिकारी यांच्यात सविस्तर चर्चा होऊन संतोष गंभीर भोई यांची धुळे जिल्हा टोल कामगार संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले.
या नियुक्ती बद्दल जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्व टोल कामगार संघटनेच्या पदाधिकारी व सदस्य यांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. तसेच एका सार्थ व तरुण तडफदार व्यक्तीची निवड झाल्याबद्दल तरुण गर्जना वृत्तपत्र परिवार, मित्र परिवार यांच्या कडून संतोष भोई यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्यात.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा