Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ३० मार्च, २०२४
लसणाआड अफूची वाहतुक करणाऱ्या संशयीत शिरपूर तालुका पोलिसांच्या जाळ्यात....
शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर तालुका पोलिसांनी मानवी मेंदूला गुंगी येणाऱ्या प्रतिबंधीत अफूची वाहतूक रोखत मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे आरोपींनी पुष्पा स्टाईल वाहनात विशेष कप्पा बनवून त्यात अफू लपवला होता व संशय न येण्यासाठी वाहनात लसणाचे पोते रचण्यात आले होते मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी चालक व वाहकाचे मनसुबे उधळले. कृपालसिंग उमेदसिंग राजपूरोहित (35, डोली पाचपदरी, जि.बारमेर, राजस्थान, ह.मु.नाकोडा स्वीट,येवला, जि. नाशिक) व रघुनाथसिंग कचरूसिंग गुजर (21,आनेडाता,सोहासरा, जि.मन्सूर, मध्यप्रदेश)अशी अटकेतील
आरोपींची नावे आहेत.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेल्या अफूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.
पळासनेर चेकपोस्टवर नाकाबंदी लावल्यानंतर महिंद्रा पीक अप वाहन क्रमांक (एम.पी.13 जी.बी.3525) याची तपासणी केली असता एका विशेष कप्प्यात पाच लाख 76 हजार रुपये किंमतीची 72 किलो वजनाचे सुकलेल्या अफूची बोंडे व सात लाख रुपये किंमतीचे दोन किलो अफीम तसेच पाच लाख रुपये किंमतीचे बोलेरा वाहन मिळून एकूण 12 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी.के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,बाळासाहेब वाघ, रफिक मुल्ला,संदीप ठाकरे,मंगेश मोरे,
चत्तरसिंग खसावद,दिनेश सोनवणे,
शिवाजी वसावे,कृष्णा पावरा,वाला पुरोहित,दिनकर पवार, रोहिदास पावरा,
जयेश मोरे,चालक मनोज पाटील आदींच्या पथकाने केली.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा