Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ७ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मीक नगर शिरपूर येथे वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न...!
आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मीक नगर शिरपूर येथे वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न...!
शिरपूर प्रतिनिधी:- आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा वाल्मीक नगर शिरपूर या ठिकाणी वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्रीमती संध्या पोतदार अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ अध्यक्ष यांनी भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रतिमा पूजनाने केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्त्या सरोज चावडा व राष्ट्र सेविका समिती कार्यवाहीका अश्विनी जोशी व मनीषा पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात वर्षभरात होणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी मिळवलेले प्राविण्याबद्दल शाळेने विद्यार्थ्यांचा गुणगौरव म्हणून वर्षभरात झालेल्या सर्व स्पर्धांमध्ये विजेते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. त्यात विशेष प्राविण्य मिळवलेल्या पालकांना शाळेकडून सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी आपल्या अध्यक्षीय भाषणाने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे व स्पर्धांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवींद्र पवार, श्रीकांत पंडित, स्वाती जगदाळे, शितल पाटील, मनीषा भदाणे, प्रवीण पावरा, पवन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा