Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ८ मार्च, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची मोठी कामगिरी...चोरीच्या ०६ मोटार सायकलींसह विविध पो.स्टे.ला दाखल असलेले ४ गुन्हे उघडकीस आणुन ०१ आरोपीतास केले जेरबंद...
शिरपर शहर पो.स्टे.चे डी.बी.पथकाची मोठी कामगिरी...चोरीच्या ०६ मोटार सायकलींसह विविध पो.स्टे.ला दाखल असलेले ४ गुन्हे उघडकीस आणुन ०१ आरोपीतास केले जेरबंद...
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या डी. बी .पथकाने दमदार कामगिरी केले असून चोरीच्या ०६ मोटार सायकलींसह विविध पो.स्टे.ला दाखल असलेले ४ गुन्हे उघडकीस आणुन ०१ आरोपीतास केले जेरबंद करून 3,30,000 लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
शिरपूर शहर पो.स्टे. गुरनं.११६/२०२४ भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी-अलाउद्दीन कुतुबुद्दिन मन्यार वय ६० व्यवसाय-नोकरी रा.वाघाडी ता.शिरपूर जि. धुळे हे दि.०५/०३/२०२४ रोजी दुपारी २.३० ते ०४.१५ वाजेचे सुमारास त्यांची होंडा कंपनीची चॉकलेटी रंगाची मो.सा.क्र.एम.एच.१८/बी.के.१९९३ तिचा चेचीस नं. ME4JC654 FHT057960 व इंजिन नं.JC65ET 1094965 असा असलेली हिचेने शिरपूर जि.धुळे शहरातील खंडेराव महाराज यात्रेनिमित्त आले असता त्यांनी त्यांची मो.सा. पाताळेश्वर मंदिर चौकात हॅण्डल लॉक करून उभी केली ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे संमतीशिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेले बावत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल आहे.शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.के.के.पाटील यांनी गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांमार्फत वेगाने
तपासचक्रे फिरविले असता गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की,एक संशयीत इसम त्याचे ताब्यातील चॉकलेटी रंगाचे विना क्रमांकाची हॉडा कंपनीची शाईन मो.सा.वर बोरगावकडुन शिंगावे गावाकडे येत आहे. त्यावरून गुन्हे शोध पथकाचे अंमलदारांना पाठविले असता त्यांना एक इसम शिंगावे ता.शिरपूर जि.धुळे गावाचे गेटजवळ मिळुन आल्याने त्यांनी त्यास थांबवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव करण सुधीर शेंडे वय २१ रा. काका शेठ गल्ली,तळोदा जि.नंदुरबार असे असल्याचे सांगितले त्यास त्याचे ताव्यातील मो.सा. बाबत विचारपूस केली असता त्याने सदरची मो.सा.२ दिवसांपूर्वी शिरपूर जि.धुळे शहरातील पाताळेश्वर मंदिर चौकातुन चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातील मो.सा.चे चेचीस नंबर व इंजिन नंबरची खात्री केली असता सदरची मो.सा. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली असल्याची खात्री झाल्याने सदर आरोपी गुन्ह्यात निष्पन्न झाला आहे.
वरनमुद आरोपीतास त्याने शिरपूर जि.धुळे शहरात अगर इतर कोठे कोठे मो.सा.चोरी करण्याचे गुन्हे केले0असुन चोरी केलेल्या मो.सा.त्याने कोठे व कोणाकडे लपवून ठेवल्या याबाबत त्यास सखोल विचारपूस करता त्याने शिंगावे ता.शिरपूर जि.धुळे शिवारातील लक्ष्मीविहार कॉलनी, चोपडा जि.जळगाव शहरात व सोनगीर ता.जि. धुळे व इतर ठिकाणाहुन चोरी केल्याचे कबूल करून चोरी केलेल्या इतर विविध कंपनीच्या ५ मो.सा.त्याने शिरपूर जि.धुळे शहरातील बस स्थानक समोरील के.व्हि.पी.हायस्कूल लगत मोकळ्या जागेत लावलेल्या असल्याचे सांगुन सदरच्या मो.सा.दाखविल्याने त्या हस्तगत करण्यात आल्या. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या व वर्णनाच्या सहा मोटरसायकली जप्त करण्यात आला असून यात पोलिसांनी एकूण तीन लाख तीस हजार रुपयांच्या मुद्देमाल जप्त केला आहे.
शिवाय चोपड़ा शहर गुरनं. ६१५/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे,सोनगीर पो.स्टे.गुरनं, ६१/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे वरप्रमाणे ०३,३०,०००/- रूपये किंमतीच्या एकूण ६ मो.सा.वरील आरोपीताकडुन हस्तगत करून एकुण ४ मो.सा.चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.श्रीकांत धिवरे,मा.अपर पोलीस अधिक्षक श्री. किशोर काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक श्री.के. के.पाटील,डी.बी.पथकाचे पोहेकों/ललील पाटील, पोना/रविंद्र आखडमल, पोकों/विनोद आखडमल, प्रशांत पवार, भटु साळुंके, आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ तसेच होमगार्ड शरद पारधी, चेतन भावसार व राम भिल अशांनी मिळून केली आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
नंदुरबार प्रतिनिधी:- नंदुरबार, दि. 26 ऑगस्ट 2025: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा पवार यांच्या मार्गदर...
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा