Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

मुहूर्त साधत महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज



शिरपूर प्रतिनिधी :- नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांनी शक्तिप्रदर्शन करत आज 12.04 चा मुहूर्त साधत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळेस त्यांनी तीन उमेदवारी अर्ज केले दाखल.जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केले दाखल.तसेच हिना गावित यांच्या बहिण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही तीन अर्ज केले दाखल केले . यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित खासदार हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित आमदार काशीराम पावरा आमदार राजेश पाडवी आमदार आमश्या पाडवी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबन चौधरी डॉ तुषार रंधे उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल  यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी सांगितले की जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगल्या घवघवित मतांनी निवडून येऊ जनता आमच्या पाठीशी असून आमच्या विजय निश्चित आहे असे त्यांनी यावेळी.सांगितले तसेच यावेळी बोलताना डॉ हिना गावित यांनी सांगितले की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची तिसऱ्यांदा उमेदवारी करताना मला मनस्वी आनंद होत आहे माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थकी ठरवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू असे त्यांनी सांगितले....


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध