Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २३ एप्रिल, २०२४

दूध व दुग्धजन्य पदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई व जनजागृती करा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...



नंदुरबार जिल्ह्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांत होणारा भेसळ रोखण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचाकडे निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत.
     
जिल्ह्यात भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात जाऊ नये ह्या साठी नंदुरबार जिल्ह्यातील अखिल भारतीय ग्राहक पंचायत विविध मागण्या जिल्हाधिकारी यांचा कडे केल्या आहेत.त्यात विनामूल्य फूड टेस्टिंग मोबाईल व्हॅन जिल्हा पातळीवर उपलब्ध करून देणे,दूध व खाद्यपदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी फ्लाईंग स्कॉड तयार करून त्यात ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधीचा समावेश करणे,तातडीने कारवाई व्हावी या साठी जिल्ह्यामध्ये पुरेशा अन्न निरीक्षकाची नियुक्ती करावी,दुधाचे नमुने तपासावे ह्या साठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तहसील कार्यालयावर मोफत टेस्टिंग स्थापन करावे,ऑक्सिटोसीन इंजेक्शनच्या अवैध साठा आणि विक्री करणाऱ्यांवर पूर्णपणे बंदी आणण्यात यावी, दुधाचा दरात दुजाभाव न करता जिल्ह्यात दुधाचे एकच दर निश्चित करावे, जिल्ह्यात भेसळयुक्त मावा(खवा)यांची परराज्यातुन सर्रास आवक होत आहे त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमुळे कॅन्सर व अन्य आजार होण्याचा घटना वाढत आहेत.या माव्याची व त्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांची रासायनिक तपासणी करून भेसळयुक्त माव्याचा वापर करणाऱ्यांवर कारवाई व जनजागृती करावी.इ.मागण्या अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा नंदुरबार कडून करण्यात आल्या.
भेसळ करणे व त्यांची विक्री करणे हा सामाजिक आणि दंडनीय गुन्हा आहे.दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची भेसळ लहान मुले व वृद्ध यांचा आरोग्याला धोकेदायक आहे.
समाजाच्या व देशाच्या हिताच्या दृष्टीने वरील मागण्या करीत आहोत असे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या जिल्हाध्यक्षा सौ. वंदना तोरवणे यांनी म्हटले आहे.
   
यावेळी अखिल भारतीय ग्राहक मंचाचे जिल्हा उपाध्यक्ष देसले सर,तळोदा तालुका अध्यक्ष डॉ. किर्ती लोखंडे, अक्राणी तालुका अध्यक्ष जितेंद्र ढोले,तळोदा तालुका उपाध्यक्ष भगवान माळी,तळोदा तालुका संघटक कैलास शेंडे,कोषाध्यक्ष भिका चव्हाण व जिल्हा कार्यकारिणी सदस्य रणजित राजपूत,संतोष कुंभार, भामरे सर इ.उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध