Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २४ एप्रिल, २०२४

भाजपा महायुती उमेदवार खा.डाॅ. हिनाताई गावित यांना बहुमताने विजयी करावे - बबनराव चौधरी



शिरपूर : नंदुरबार लोकसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. डाॅ. हिनाताई गावीत यांच्या प्रचारार्थ शिरपूर विधान सभा मतदार संघातील रोहिणी जिप गटात रोहिणी, खामखेडा, खंबाळे येथे खा. डाॅ. हिनाताई गावीत, आ.काशिराम पावरा, धुळे भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार जिल्हा भाजपाचे ज्येष्ठ नेते कांतीलाल टाटीया, नंदुरबार लोकसभा निवडणुक प्रमुख तुषार रंधे यांचा प्रमुख उपस्थित काॅर्नर सभा झाल्यात. यावेळी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा सांगवी मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा, भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जयवंत पाडवी, जि. प. समाज कल्याण सभापती कैलास पावरा, शिरपूर पं.स.सभापती प्रतिनिधी वसंत पावरा, विधान सभा निवडणुक प्रमुख के.डी.पाटील, भटके विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई,अनु.जाती मोर्चा मा. जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस संजय आसापुरे, जि.प सदस्य योगेश बादल, जि.प.सदस्या सौ. बेबीबाई पावरा,पं.स.सदस्या सौ. प्रभाबाई कोकणी, माजी सदस्य बालकिसन पावरा, शिरपुर कृउबा समिती संचालक मिलिंद पाटील, शिरपूर पं. स. माजी सभापती रतन पावरा, भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर बोरसे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश बोरसे, शहराध्यक्ष विक्की चौधरी आदि उपस्थित होते. या काॅर्नर सभेत जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, केंद्र शासन योजनेचा, पंतप्रधान उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना, शेतकरी सन्मान निधी, शिक्षकांना ७ वा वेतन आयोग, आयुष्यमान योजना गरिबांना मोफत उपचार ५.०० लक्ष रु. पर्यंत, जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा योजना अंतर्गत नवीन विहीर व पाण्याचा स्रोत पाहून ही योजना अमलात अनु व घरोघरी नळ जोडणी होणार आहे. 

कोरोना काळात लस मोफत ग्रामीण कोरोना काळात केंद्र सरकार स्वस्त धान्य किट व मोफत रेशन दिले. तसेच राज्य सरकारने ७५ वर्षावरील महिला व पुरुषांना मोफत बससेवा व बाकी महिलांना अर्ध्या तिकिटाची सोय केली असल्याचे सांगितले. काम करणाऱ्या उमेदवाराला संधी द्या आपलं मत विकासाला म्हणजेच भाजपाला द्या. तसेच मोदींचा अजेंडा भारताला महासत्ता बनवायचा आहे. याचा निर्धार करून भाजपाला म्हणजेच खा. डाॅ. हिनाताई गावीत यांना बहुमताने कमळ या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन केले. यावेळी काॅर्नर सभेमध्ये भाजपाला मताधिक्य देण्याचे संबंधित गावकरी यांनी तर दिलेच अब की बार ४०० पार चा नारा हि दिला. काॅर्नर सभेचे सुत्रसंचलन व आभार प्रविण शर्मा यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध