Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

नंदुरबार प्रतिनिधी :- महायुतीच्या उमेदवार खासदार हीना गावित यांच्या प्रचाराला  आजपासून प्रारंभ, शहरातून काढण्यात आली रॅली... 

महायुतीचे उमेदवार डॉ हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आज खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात केली नंदुरबार शहरातील मानाचे गणपती मंदिर येथे आज महाआरती करून या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व खा. हीना गावित यांच्या हस्ते मंदिरात पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली.

यावेळी महामंत्री विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शहरातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली.यावेळी ठिकठिकाणी खासदार हीना गावीत यांचे औक्षण करण्यात आले.यावेळी असंख्य कार्यकर्त्या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी खासदार हिना गावित आणि सांगितले की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनणार आहेत.जनतेचा प्रधानमंत्री यावर विश्वास आहे. केंद्राच्या विविध विकास योजना या तळागाळातील जनते पर्यंत पोहोचल्या आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे. असे खासदार हीना गावित यांनी सांगितले...


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध