Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

खुनाच्या घटनेनंतर संतप्त जमावाचा शिरपूर शहर पोलीस ठाण्यावर हल्लाबोल; अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; चार पोलिस जायबंदी



शिरपूर प्रतिनिधी दि.२६- शिरपूर तालुक्यातील करवंद गावातील आनंदवाडी येथे जामा नामू भिल यांच्या हत्येनंतर आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. मारेकऱ्यांना आमच्या ताब्यात
द्या, अन्यथा इथच फाशी द्या, ही मागणी घेवून गुरूवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास २०० ते २५० जणांचा जमाव शिरपूर पोलीस ठाण्यावर चाल करुन आला. यावेळी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी करुन पाहिला. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यातील काहीजण हिंसक झाले व त्यांनी थेट पोलीस ठाण्यावर हल्लाबोल केला. या घटनेत चार पोलीस कर्मचारी जायबंदी झाले आहेत.

शिरपूर तालुक्यातील करवंद येथे दि.२४ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास करवंद गावातील आनंदवाडी येथे एका ठिकाणी मेहंदीचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी जामा भिल यांचा मुलगा देखील उभा होता दरम्यान यास विजय कोळी याने खाली बसण्यास सांगितले. मात्र तो उभाच राहिला विजय कोळी याने त्याला लाथ मारली. त्यामुळे मुलाने घरी जाऊन वडील जामा भिल यास सांगितले. यावरून विजय कोळी याला विचारणा केली असता त्यांच्यात वाद झाला वादातून विजय कोळी याने त्यांच्याकडील गुप्तीसारख्या हत्याराने जामा भिल याच्यावर वार केल्याने ते गंभीर जखमी होऊन मरण पावला. तर एकाने फिर्यादीच्या डोक्यावर वीट मारल्याने तो गंभीर जखमी झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. 

फिर्यादीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विजय सुदाम कोळी, विकी गोकुळ शिरसाट (कोळी) व सुदाम पुंजू कोळी सर्व राहणार करवंद तालुका शिरपूर यांच्या विरुद्ध गुन्ह्यासह ट्रॉसिटी प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत एका संशयितांना शहर पोलिसांनी रात्री अटक केली आहे. मात्र दि. २५ एप्रिल रोजी सकाळी उर्वरित संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची जमावाने भूमिका घेतली.तसेच त्याचवेळी करवंद येथून हातात लाठ्या काठ्या लोखंडी घावन सळई हातात दगड घेऊन जमावाने थेट पोलीस स्टेशनवर हल्ला केला घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तहसीलदार महेंद्र माळी, साक्री उपविभागीय अधिकारी साजन सोनवणे पोलीस निरीक्षक के. के.पाटील यांनी चौक बंदोबस्त तैनात करून सप्त जमवाला शांत करण्याचा प्रयत्न करीत असताना जमावाने थेट पोलिसांवर दगडफेक सुरू केली. यात महिला पोलीस पौर्णिमा पाटील नूतन सोनवणे प्रतिभा देशमुख आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज पंडित हे जखमी झाले.तर काही पोलीस कर्मचाऱ्यांना दगड लागल्याने किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करत जमाव पांगवीला घटनेनंतर शहरात करवंद येथे तणावपूर्व शांतता पसरली आहे.अप्पर पोलीस किशोर काळे यांच्यासह सोनगीर पोलीस ठाण्याचे पीआय जयेश खलाणे, शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील, दोंडाईचाचे एपीआय निलेश मोरे हे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध