Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ मे, २०२४

धुळे येथील ट्रॅव्हल्स पॉईंट जवळ बोगस एसटीबीटी कॉटनचे 400 पॅकेट धुळे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पकडले



मा.मोहन वाघ सर, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली
आज दि.१२.०५.२०२४ रोजी मिळालेल्या गुप्त  खबरीनुसार 
मे. पद्मालय टूर्स अँड ट्रॅव्हल्स झाशीच्या राणीच्या पुतळ्याजवळ धुळे येथे प्रतिबंधित संशयित एचटीबीटी बोगस  कापुस बियाणेची चारशे पाकीटे जप्त करण्यात आली आहेत. 
आज सकाळी ६.३० वाजेच्या  सुमारास 
श्री. अरुण तायडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धुळे,श्री.नितेंद्र पानपाटील,विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक विभाग नाशिक
श्री.अभय कोर,कृषी अधिकारी पंचायत समिती धुळे यांच्या पथकाने पहाटे ५.०० वाजेपासून पाळत ठेवून खाजगी प्रवासी वाहतूक बसने आलेल्या ४०० पाकिटे ताब्यात घेतली.
शहर पोलीस ठाणे, धुळे येथे श्री.अरुण तायडे यांनी संशयित अशोक भाई (पूर्ण नाव माहित नाही), ट्रान्सपोर्ट कंपनी यांचे विरोधात बियाणे कायदा १९६६,पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ व जीवनावश्यक वस्तू कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
घेतल
या कारवाईसाठी मा.कैलास शिरसाठ,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी धुळे, 
सौ. कावेरी राजपूत, कृषी विकास अधिकारी (जि.प) धुळे यांनी मार्गदर्शन केले.
हा सापळा यशस्वी करण्यासाठी कृषी सहायक श्री.नितिन मासुळे व श्री.मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले.
प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या विरोधात गय केली जाणार नाही असा कडक इशारा मा.मोहन वाघ सर , विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध