Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १२ मे, २०२४

शिरपूर तालुका पोलिसांची मोठी कारवाई... गावठी बनावटीचे कट्टे पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त....



शिरपूर प्रतिनिधी :- शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कारवाई करत गावठी बनवतीचे कट्टे पिस्टल व जिवंत काडतुसे यासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.

यात दिनांक 11 मे 2019 रोजी बातमी प्राप्त झाले होते की दोन्ही इसम गावठी बनावटीचे कट्टे व जिवंत पाटील काडतूस बेकायदेशीर त्यांच्या कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मध्यादेकडून खामपखेडा शिरपुर मार्गाने येत आहेत अशी बातमी प्राप्त झाली होती. याबाबत सापडला लावून कारवाई केली असता खामखेडा शिरपुर रोडवरील खामखेडा उमटी मध्यप्रदेश कडून एका मोटार सायकलवर दोन इसम डबलसिट बसलेले येतांना दिसले. त्यातील मागे बसलेल्या इसमाच्या हातात पांढ-या रंगाच्या रुमालात काही तरी गुंडाळलेले दिसले. सदर मोटार सायकल चालकाला इशारा देवुन थांबविले असता पोलीसांना पाहून त्याने मोटार सायकलचा वेग वाढवून शिरपुरच्या दिशेने मोटार सायकल पळवून घेवून जात असतांना त्यांचा पाठलाग केला खामखेडा गावा जवळ रोडाच्या बाजुस त्यांनी त्यांची मोटार सायकल फेकून दिली व ते दोघे जवळच असलेल्या बाजरीच्या शेतात पळाले. पोलीसांनी बाजरीच्या शेतातुन त्यांचा पाठलाग करुन पुढे काही अंतरावर असलेल्या अनेर नदीच्या काठाजवळ असलेल्या काटेरी झुडपातून आरोपी पळून जात असतांना त्यांना पकडले. त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नांवे ।) बाबासाहेब रामभाऊ मिसाळ वय 28 मूळ रा. जानेफळ ता. भोकरदन जि. जालना ह.मू संभाजीनगर, जय भवानीनगर गल्ली नं.11 अंकुश पवार यांचे घरात भाडेतत्त्वावर जि संभाजीनगर 2) परमेश्वर भाऊसाहेब मिसाळ वय 26 वर्षे रा. देवळीगव्हाण ता. जाफराबाद जि. जालना असे सांगितले. आरोपी क्रमांक । बाबासाहेब रामभाऊ मिसाळ याचे हातात पांढ-या रंगाच्या रुमालात गुंडाळलेल्या कापडी पिशवीसह दोघांना बाजरीच्या शेतातून खामखेडा रोडवर आणले व पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात खालील प्रमाणे

 मुददेमाल मिळून आला. 1) 1,50,000/- रुपये किंमतीचे एकूण 5 गावठी बनावटीचे कटटे (पिस्टल)

2) 22,000/- रुपये किमतीचे 9 एम. एम. चे.।। जिवंत काडतुसे 3) 1,30,000/- रुपये किंमतीची प्लसर कंपनीची मोटार सायकल क्रमांक एम. एच.20 एफ.ई.5363

एकुण 3,02,000/-

असा मुददेमाल मिळुन आला असून दोन्ही आरोपीविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 सह म.पो.का. कलम

37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा. श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक, धुळे श्री. किशोर काळे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे, श्री. भागवत सोनवणे, उप विभागीय पोलीस अधिकारी, शिरपुर विभाग शिरपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, असई

रफिक मुल्ला, पोहेको  संदीप ठाकरे, पोकों  भुषण पाटील, पोकों/संजय भोई, पोकों  स्वप्नील बांगर, पोकों/ योगेश मोरे, पोकों/कृष्णा पावरा, चापोलेकों  अलताफ मिर्झा, चापोको मनोज पाटील यांनी केली आहे .



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध