Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ मे, २०२४

जादा दराने कापुस बियाणे विक्री करणा-या हेंद्रुन येथील मे.साईबाबा ऍग्रो सेंटरवर धुळे जिल्हा कृषी विभागाकडून गुन्हा दाखल.



भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जादा दराने कापुस बियाणे विक्री करणाऱ्या धुळे तालुक्यातील बियाणे विक्रेता मे.साईबाबा ऍग्रो सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे.
भरारी पथकाने त्यांचा समक्ष एक बनावट ग्राहक पाठवून एका नामांकित कंपनीचे बियाण्याची दोन पाकीटांची मागणी केली.
बियाणे विक्रेत्याने सदरचे पाकिटे रक्कम रुपये ८६४ /- प्रति पाकीट किंमत असताना बनावट ग्राहकाकडून रक्कम रुपये ११२५/- ची मागणी केली मात्र सदर बियाणे पाकिटे विक्री पोटी बिल देताना रक्कम रुपये प्रति बियाणे पाकीट याप्रमाणेच दिले.
बनावट ग्राहकाने पाकीट ताब्यात घेतल्यानंतर तातडीने भरारी पथकाने छापा मारून सर्व पाकिटे जप्त केली.
महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, बियाणे कायदा १९६६, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ व भादंवि १८६० मधील कलम ४२०/३४ अन्वये श्री.अरुण तायडे,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे यांनी मोहाडी पोलीस स्टेशन ता.जि. धुळे येथे वरील कायद्यान्वये
मे. साईबाबा ऍग्रो सेंटरचे परवानाधारक
ज्ञानेश्वर दगडू नवसारे व मनोहर दगडू नवसारे बंधु विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
श्री.मोहन वाघ, विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग नाशिक,श्री.कैलास शिरसाठ ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धुळे व
सौ.कावेरी राजपुत,कृषी विकास अधिकारी जि.प.धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने ही कारवाई केली आहे.
या कारवाईसाठी  विभागीय नियंत्रण निरीक्षक श्री.नितेंद्र पानपाटील,प.रदिप निकम,मोहीम अधिकारी,तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश, तंत्र सहायक खुशाल   पाटील ,प्रेमजित गिरासे व मनोज पाटील यांनी परिश्रम घेतले. 
पुढील तपास  पोलीस उपनिरीक्षक श्री.काळे करीत आहेत.
सदर कारवाईच्या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक मा.मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की कुणीही जादा दराने कृषी निविष्ठा खरेदी करू नये.अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करताना पक्की पावती मागावी.
कृषी निविष्ठा खरेदी करताना अडचण असल्यास शेतकरी बांधवांनी कृषी विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध