Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ३० मे, २०२४

शिरपूर तालुक्यात लाकडाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाकडून मोठी कारवाई....



शिरपूर प्रतिनिधी दिनांक 28/05/2024 रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून मा.श्रीमती निनु सोमराज, वनसंरक्षक प्रादेशिक धुळे मा.श्री नितीन कुमार सिंग,उपवनसंरक्षक धुळे वनविभाग धुळे, व मा.श्री राजेंद्र सदगीर, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे.म.सहा.वनसंरक्षक शिरपूर यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्र शिरपूर प्रादेशिक परिमंडळ सुळे निंयतक्षेत्र दहिवद  बिटातील आडे ते शिरपूर रस्त्यावर रात्री 11.30 वाजेच्या सुमारास विना परवाना निम प्रजातीचे लाकुड अवैध वाहतूक करताना वाहन पकडले वाहन क्रमांक MH02CE 5632.वन गुन्हा नोंदविण्यात आला. महेंद्र पिकप वाहनाची व मालाची किंमत 150000 रुपये एवढी सदरील  चार चाकी महेंद्र पिकप वाहन रेंज कार्यालय शिरपूर येथे जमा केले. 

पुढील तपास वनपाल सुळे करीत आहेत.सदरची कार्यवाही भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41, (2) ब 42 (1)(2) ब 52(1)महाराष्ट्र वन नियमावली 2014 अन्वये करण्यात आली.सदरची कारवाई मा.श्री के डी देवरे वनक्षेत्रपाल शिरपूर आर.ई पाटील वनपाल रोहिणी ,मनोज पाटील वनरक्षक सुळे, कृष्णकांत साळुंखे वनरक्षक दहिवद , राहुल देसले वनरक्षक निमझरी,इत्यादी वन अधिकारी व कर्मचारी यांच्या समूहाने सदरील कारवाई यशस्वीरित्या केली. पुढील तपास चालू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध