Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ९ मे, २०२४

संत नगरी शेगाव शासकीय विश्रामगृह येथे नवनियुक्त भोई समाज कर्मचारी यांचा भोई समाज शेगाव शहर व ग्रामीण च्या वतीने केला सत्कार



शेगाव शहर प्रतिनिधी: (उमेश राजगुरे)आज दिनांक 8 मे 2024 भोई समाज कर्मचारी शेगाव येथे नव नियुक्त कर्मचारी यांचा भोई समाज शेगाव शहर व ग्रामीण च्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे स्वागत करण्यात आले त्यामध्ये  श्री शांताराम जी हरणे RPF, Pi, शेगाव रेल्वे स्टेशन, Dr प्रोजेक्ट विलासराव भामोद्रे जिगाव प्रकल्प शेगाव, अक्षय सूर्यवंशी प्राध्यापक माऊली कॉलेज शेगाव, संदीप इंगळे जिगाव प्रकल्प आरेकक, बाबुराव राजगुरे शेगाव तहसील कोतवाल, तसेच समाजसेवक श्री भास्करराव नंदाने यांचा वाढदिवसानिमित्त त्यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, शासकीय विश्रामगृह येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शांताराम जी हरणे यांचे स्वागत अंबादासजी मेसरे यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अक्षय जी सूर्यवंशी यांचे स्वागत रमेश जी भामोद्रे यांनी केले, संदीप जी इंगळे यांचे स्वागत गजानन जी ढोके यांनी केले, बाबुरावजी राजगुरे यांचे स्वागत हरिदासजी नंदाने यांनी केले, समाज सेवक भास्करराव नंदने यांचा वाढदिवस सर्व प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी दोन दोन मिनिटाचे समाजाकरिता मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्षांचे मनोगत समाजाकरिता नेहमी अडचणीला तत्पर राहणार असे आवाहन करण्यात आले.

तर प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रांजल विलासराव भामोद्रे,अक्षय सूर्यवंशी, संदीप इंगळे ,बाबुराव राजगुरे, कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती समाजसेवक रामरावजी बावणे, किशोर जी मोरे, रमेश जी भामोद्रे,गजानन ढोके, भास्करराव नंदाने, देविदासजी कुसुंबे, अंबादासजी  मेसरे, वासुदेवजी ढोके, अरुणजी माहोरे, समाजसेविका  सौ.नर्मदाताई बावणे, अरुणजी नंदाने, अंबादासजी मेसरे, अनिलजी अळणे, महादेवजी श्रीनाथ, भाजपा मच्छीमार सेल खामगाव जिल्हाध्यक्ष राजेशजी श्रीनाथ, भाजपा मच्छीमार सेल खामगाव जिल्हा सचिव प्रकाश जी भारसाकळे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश जी भामोद्रे साहेब यांनी केले कार्यक्रम यशस्वी इतर पार पाडण्याकरिता किशोरजी मोरे, हरिदासजी नंदाने , महादेव जी श्रीनाथ, उमेशजी राजगुरे यांनी परिश्रम घेतले,तर आभार प्रदर्शन समाजसेवक भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्ष तथा भाजपा शेगाव सोशल मीडिया प्रमुख उमेश राजगुरे यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध